आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tisgaon Gang Rape: Convict Not Read Newspaper, Illiterate

तिसगाव सामुहिक बलात्कार : 'तो' वृत्तपत्र वाचत नाही आणि 'ती' अशिक्षित; म्हणून पडले बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘तो’आहे २५ वर्षांचा. शिक्षण १०वी पर्यंत झालेले असले तरी वृत्तपत्रांशी काहीही संबंध नाही. अंगमेहनतीचे काम करून पैसे मिळवतो. त्यामुळे वृत्तपत्र वाचायला वेळही नसेल आणि पैसेही. त्यामुळेच महिनाभरापूर्वी सुंदरवाडीत काय घडले आणि कशामुळे घडले याची सुतराम कल्पना त्याला नाही. ‘ती’ तर अशिक्षितच. त्यामुळे गप्पा मारण्यासाठी ते दोघे तिसगावच्या मैदानात थांबले आणि विखारी वासनांधांनी तिचे लचके तोडले.

दोन दिवसांपूर्वी तिसगाव शिवारात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील तरुणीच्या मित्राची भेट घेतली तेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीचं भान नसलं की काय घडू शकतं याचं ज्वलंत उदाहरणच समोर बोलतं झालं. महिनाभरापूर्वी सुंदरवाडीला सामूहिक बलात्काराचा गुन्हा कशा परिस्थितीमुळे घडला हे जगजाहीर झाले असतानाही या युगुलाने तीच चूक कशी केली? याची उत्सुकता होती. म्हणून मुद्दाम या तरुणाची भेट घेतली. अर्थात, त्याची ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवरच. घडलेल्या घटनेने तो पार खचून गेला आहे. आपल्यामुळे ‘तिला’ नरकवास भोगावा लागला आहे याची नुसती जाणच त्याला आहे असे नाही तर त्या जाणिवेच्या ओझ्याने तो दबून गेला आहे. जे घडले त्यातून सावरण्यासाठी पोलिस बळ देताहेत, याचाही तो आवर्जून उल्लेख करतो. पोलिसांच्या तत्परतेनेच ते चार नराधम गजाआड झाले आहेत, याचीही कृतज्ञता त्याच्या बोलण्यातून येते. त्यांना तर कठोर शिक्षा होईल; पण त्या मुलीच्या आयुष्याचे काय? हा प्रश्न विचारायच्या आधीच त्याच्या बोलण्यातून त्याचेही उत्तर आले, आमचे कुटुंबीय स्वीकारतील किंवा नाही माहिती नाही; पण काहीही झाले तरी मी तिला अंतर देणार नाही. आता तिच्याशीच लग्न करणार आहे आणि या वातावरणापासून लांब जाऊन दोघांचे आयुष्य नव्याने सुरू करणार आहे, असे तो सांगतो आहे.

पुढे वाचा.. आम्ही दूर निघून जाऊ