आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसगावात जमिनीच्या वादातून वडिलांचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - जमिनीच्या वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात वीट मारून खून केल्याची घटना तिसगाव (ता. औरंगाबाद) येथे बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी आरोपी बाळू सोनाजी सोनवणे (३८) यास अटक केली आहे.

दारूचे व्यसन असणार्‍या बाळूला दोन मुली दोन मुले आहेत. तो खवड्या डोंगरालगतच्या खदानीमध्ये मजुरी करतो. बुधवारी वडील सोनाजी सोनवणे (६०) यांच्याशी त्याचा जमिनीवरून वाद झाला. रागाच्या भरात बाळूने सोनाजी यांना वीट फेकून मारली. ती त्यांच्या डोक्यात लागून बेशुद्ध होऊन जागेवरच खाली पडले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सोनाजी यांची विवाहित मुलगी मनीषा हिच्या फिर्यादीवरून बाळूविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बाळूची पत्नी गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी असल्यामुळे तिला सासरी घेऊन येण्याच्या कारणावरून बाप-लेकात वाद झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्याची नोंद पोलिसांत मनीषाच्या सांगण्यावरून करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...