आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी हाती घेतली पाटी: गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन -गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील न्यू हायस्कूलमध्ये अकरा शाळाबाह्य विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन प्रवेश देण्यात आला. आरटीई अधिनियमानुसार, १० जुलै रोजी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्व्हे करण्यात आला होता.
या वेळी आढळून आलेल्या १७ शाळाबाह्य मुलांपैकी ११ मुलांना न्यू हायस्कूलमध्ये प्रवेश देण्यात आल्याचे मुख्याध्यापक आर. एस. कहाटे यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात सहा ते चौदा वयोगटातील मुले शाळाबाह्य आहेत का, याकरिता दहा जुलै रोजी एकदिवसीय सर्वेक्षण अभियान राबवण्यात आले होते. त्यामध्ये लासूर स्टेशन येथील अकरा मुले व सहा मुली या शाळाबाह्य असल्याचे आढळून आले होते. मुलांना वयानुसार इयत्ता पाचवी ते आठवीत प्रवेश देण्यात आला आहे.

या वेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. तसेच त्यांना शिक्षकांनी दत्तक घेऊन वर्षभर चांगले शिक्षण देण्याची हमी घेतली. सहशिक्षक द्वारकादास निकम, सोमनाथ जाधव, अविनाश गायकवाड, अरुण वेताळ, श्रीकृष्ण दवणे, चंद्रशेखर शिंदे, विजय गायकवाड, अविनाश गायकवाड आदींनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत केले.
बातम्या आणखी आहेत...