आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • To Clean The City Of Garbage Collection Vehicles

स्वच्छ शहरासाठी कचरा संकलन वाहनयंत्राची निर्मिती, मनपासमोर करणार सादरीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - "स्वच्छ भारत अभियाना'साठी सेल्फी काढून अनेकांनी सोशल मीडिया गाजवला; पण देशाला भेडसावणाऱ्या कचरा व्यवस्थापनासाठी मात्र कुणी काहीच करताना दिसत नाही. अशा स्थितीत सामाजिक आरोग्य अन् परिसर स्वच्छता ही आपली जबाबदारी असल्याचा संदेशपीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने दिला आहे.
स्वच्छतेसाठी सरसावणाऱ्या हातांचा भार कमी करण्याकरिता त्यांनी कचरा संकलन यंत्र तयार केले आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी काम करणाऱ्या हातांची संख्या पुरेशी नाही. गल्लीबोळात ही यंत्रणा पोहोचू शकत नाही. शिवाय जे मजूर कचरा गोळा करण्यासाठी राबतात त्यांच्यासह इतरांच्या आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. हे वास्तव लक्षात घेता, पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानात आपलाही सहभाग असावा, या हेतूने पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रसाद लामधाडे, भूषण आपटे निकिता ढंगारे या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील प्रोजेक्टअंतर्गत कचरा संकलन वाहनयंत्र तयार केले आहे. अरुंद गल्लीबोळातून कचरा संकलन करण्याच्या समस्येवर हा उत्तम पर्याय ठरणार आहे. या यंत्राचा वापर बांधकाम साहित्य आणि
शेतीमधील साहित्य वाहून नेण्यासाठीही करता येऊ शकतो. या प्रकल्पासाठी प्रा. विवेक थेटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, विभागप्रमुख डॉ. एम. एम. धोबे, प्रा. आर. जी. पंगुळे, प्रा. ए. एस. बाविस्कर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.
यंत्राचे पेटंट मिळवण्याचा प्रयत्न आहे
कचरा उचलणाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत. यावर उपाय म्हणून हा प्रोजेक्ट एक पर्याय ठरू शकतो. तो अधिक सक्षम बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल. या यंत्राचे पेटंट मिळवण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाची माहिती सादर करणार आहोत . - प्रसाद लामधाडे, विद्यार्थी
असा होईल फायदा
हे कचरा संकलन यंत्र छोट्या छोट्या गल्लीबोळातून सहज नेता येते. हात खराब होत नाहीत. कमी वेळात अधिकाधिक परिसरातील कचरा गोळा करता येईल. कचरा उचलण्याबरोबरच इंडस्ट्रीमध्ये, बांधकाम व्यवसायातदेखील याचा वापर सामान उचलण्यासाठी होऊ शकतो.
असे तयार झाले यंत्र
या यंत्रासाठी साडेपाच हजार रुपये खर्च आला. माइल्ड स्टील, अॅल्युमिनिअम अथवा नायलॉनचे टायर, एक रबरचे टायर वापरण्यात आले आहे. तसेच मेटल शीट, जुन्या सनी गाडीचे इंजीन वापरले आहे.
पेट्रोलवर चालणारे यंत्र एका लिटरमध्ये ४० किलोमटरपर्यंत मायलेज देते. ६० किलो वजन पेलण्याची क्षमता आहे.
पीईएस अिभयांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले कचरा उचलण्याचे यंत्र.