आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनात मेळ नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नाशिक येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. जे भाविक नाशिकला शाही स्नानासाठी जाऊ शकत नाहीत असे भाविक औरंगाबाद जिल्ह्यातील गोदातीरावर स्नानासाठी गर्दी करतात. जिल्ह्यातील ही गर्दी तसेच कुंभमेळ्याच्या निमित्ताने पर्यटकांची होणारी गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाने कोणतीही तयारी केली नसल्याचे दिसत आहे. १४ जुलै ते १८ सप्टेंबर दरम्यान हे पर्व असून याच कालावधीत जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील काही महत्त्वाच्या ठिकाणी शाही स्नानासाठी मोठी गर्दी होते.

पैठण,गंगापूर, वैजापूरच्या गोदातीरावर गर्दी : नाशिकविभागीय आयुक्तांनी फेब्रुवारी रोजी औरंगाबाद, नगर, धुळे आदी जिल्हाधिकार्‍यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नाशिक जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या जिल्ह्यांना सुरक्षा तसेच गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. २९ ऑगस्ट, १३ सप्टेंबर १८ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये होणार्‍या शाही स्नानासाठी मोठी गर्दी होणार आहे. याच दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या जलमार्गातील पैठण, कायगाव टोगकासह काही महत्त्वाच्या ठिकाणीही शाही स्नानासाठी गर्दी होईल.

वैजापूर तालुक्यातही नदीकाठच्या हेमाडपंती मंदिरांमध्ये गर्दी होते. एकाच दिवशी गर्दी होणार असल्याने ती नियंत्रित करण्यासाठी तसेच आकस्मिक परिस्थिती उद््भवल्यास काय उपाययोजना करण्यात येतील यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने पैठण, गंगापूर आणि वैजापूर तहसील कार्यालयांकडून आपापल्या तालुक्यातील शाही स्नानाची महत्त्वाची ठिकाणे, नदीकाठच्या मंदिरांची माहिती मागवली होती. मात्र, तीन महिन्यांपासून एकाही तहसील कार्यालयाकडून यासंदर्भात कोणतीही माहिती पाठवली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही माहिती मागवली
जलमार्गाती लगावे, घाट सुविधा असलेली गावे, पुरातन मंिदरे, स्नान करण्याची व्यक्तिक्षमता, संगमस्थळापासून मुख्य रस्त्याचे अंतर, वाहनतळ क्षमता, शोध बचाव पथक, गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीबाबत माहिती मागवण्यात आली होती. घाटाजवळ भाविकासांठी तात्पुरते तंबू, जागा स्वच्छता, सपाटीकरण यासाठी एकूण सिंहस्थ पर्वकाळात किती खर्च होतो याच्या अंदाजपत्रकाबाबतची माहिती पैठण, गंगापूर, वैजापूर, तहसील कार्यालयाकडून मागवण्यात आली होती. मात्र, या सर्व माहितीला या कार्यालयाने केराची टोपली दाखवली आहे.
बातम्या आणखी आहेत...