आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहा तास अाधीच वेबसाइटवर कळेल औरंगाबादमधील हवामानाचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अौरंगाबाद आणि १० किलोमीटर परिसरातील हवामानात क्षणाक्षणाला घडणारे बदल टिपणारी अद्ययावत यंत्रणा महात्मा गांधी मिशन संस्थेमध्ये तयार झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे मराठवाड्यातील पहिले हवामान केंद्र एमजीएममध्ये सुरू झाले असून तारखेला याचे लाेकार्पण होणार आहे. या केंद्रामुळे सहा तासअाधी औरंगाबादमधील हवामानाचा अंदाज वेबसाइटवर कळेल. शिवाय हवामानविषयक १५ मानकांची येथे माहिती मिळू शकेल. जगभरातील वेधशाळांच्या नेटवर्कशी जाेडले गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीची देवाणघेवाण करता येईल. सोबतीला एका अॅपद्वारे मोबाइल तसेच इंटरनेटवरही रिअल टाइम डेटा उपलब्ध होईल. संशोधक, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

हवामानातील बदलांची नोंद घेण्यासाठी आतापर्यंत चिकलठाणा वेधशाळेवर अवलंबून राहावे लागत आहे, तर अधिक माहिती कुलाबा वेधशाळा, पुणे वेधशाळा आणि नांदेड येथील एमजीएमच्या हवामान केंद्रात मिळते. औरंगाबादसाठी स्वतंत्र असे हवामान केंद्र उपलब्ध नव्हते. महात्मा गांधी मिशन संस्थेने ही उणीव भरून काढली आहे. एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमजीएमच्या औरंगाबाद कॅम्पसमध्ये हे केंद्र सुरू झाले आहे. एमजीएमच्या नांदेड हवामान केंद्राचे प्रमुख श्रीनिवास औंधकर यांचा अनुभव यासाठी कामास आला. व्हेदर स्टेशनची यंत्रसामग्री एमबीए विभागाच्या टेरेसवर बसवण्यात आली आहे. एमबीए विभागप्रमुख आशिष गाडेकर तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. डॉ. संगीता शिंदे यांच्या संगणकावर याचे मॉनिटरिंग होते. १८ जूनपासून प्रायोगिक तत्त्वावर केंद्राला सुरुवात झाली असून जुलै रोजी याचे अधिकृत लोकार्पण केले जाईल.

संशोधकांसाठी उपयुक्त
एमजीएममध्ये सुरू करण्यात आलेले हवामान केंद्र अद्ययावत स्वरूपाचे आहे. मराठवाड्यातील विद्यार्थी, संशोधक अाणि पर्यावरणप्रेमींना याचा फायदा होणार आहे. हवामानाविषयी धोक्याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे मोठे नुकसान टाळता येईल. अॅपमुळे मोबाइलवरही हवामानाची माहिती समजू शकेल. -अंकुशराव कदम, सचिव, एमजीएम
पुढे वाचा.. मोबाइलवरही माहिती
बातम्या आणखी आहेत...