आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज ९ तासांचा शटडाऊन, पाणीपुरवठ्यावर परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी पाणीपुरवठ्याचा तब्बल ९ तासांचा शटडाऊन घेतला जाणार असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलले असल्याचे औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीने म्हटले असले तरी प्रत्यक्षात पुढील किमान दोन दिवस शहरात पाण्याची ओरड राहण्याची शक्यता आहे.

वीज यंत्रणेच्या देखभालीची कामे तसेच १४०० व ७०० मिमी जोड जलवाहिनीवर व उड्डाणपुलाखाली व्हाॅल्व्ह बसवण्याचे काम करण्यासाठी २८ जुलै रोजी शटडाऊन घेतलला जाणार आहे. या शटडाऊनमुळे मंगळवारी सायंकाळनंतर पाणीपुरवठा होणार नाही. शिवाय टाक्या भरण्यास ९ तासांनंतर प्रारंभ होणार असल्याने बुधवारी व गुरुवारीही पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या शटडाऊनच्या काळात व्हाॅल्व्हच्या कामांसोबतच शहरातील १२ जलकुंभांची सफाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शटडाऊन संपल्यावर या कोरड्याठाक टाक्या भरणे सुरू होईल व नंतरच पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. या काळात शहरातील टँकर वितरणावरही परिणाम होणार आहे.