आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्याच्या खरेदीसाठी नोकरदारांवरच भिस्त, सराफा संघटनेचे अध्यक्ष वारेगावकरांचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पावसामुळे हातून पिके गेल्याने बळीराजा नाराज आहे. फक्त नोकरदार वर्गात सोने खरेदीचा उत्साह राहील. साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून विजयादशमीला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. यंदा नोकरदार वर्गात सोने खरेदी जास्त होईल, असा अंदाज सराफा संघटनेचे अध्यक्ष राम वारेगावकर यांनी व्यक्त केला.
पाऊस समाधानकारक असल्याने दसरा, दिवाळीला सोने विक्रीत वाढ होण्याचा अंदाज होता. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने दसऱ्याला तो फारशी खरेदी करणार नाही. दरम्यान, दागिन्यांपेक्षा शुद्ध सोन्याची ५, १० ग्रॅमची नाणी अाणि बिस्किटे खरेदी करण्याकडे नोकरदारांचा कल आहे, असेही त्यांनी सांगितले.

लाखांवरील खरेदीसाठी पॅनकार्ड हवेच : दोनलाखांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी करावयाचे असेल तर पॅनकार्ड सक्तीचे आहे. त्याची झेरॉक्स प्रत दुकानदाराला द्यावी लागते. हा नियम मागील दिवाळीत नव्हता, पण गत सहा ते आठ महिन्यांपासून सक्तीचा केल्याने ग्राहकांना त्याची सवय झाल्याचेही सराफांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...