आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादला बारा वाजेपर्यंत मिळणार नवीन महापौर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : औरंगाबाद शहराचा २० वा महापौर उद्या (दि. २९ एप्रिल) निवडला जाणार असून मध्यान्हीच्या सुमारास शिवसेनेचे त्र्यंबक तुपे की एमआयएमचे गंगाधर ढगे, काँग्रेसचे अफसर खान या लढतीचा फैसला झालेला असेल. राजकीय गणित पाहता शिवसेना-भाजप युतीचे त्र्यंबक तुपे यांची महापौरपदी निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमहापौरपदासाठी भाजपचे प्रमोद राठोड, एमआयएमचे नासेर सिद्दीकी आणि काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप हे रिंगणात आहेत.
निवडणूक कार्यक्रम
पीठासीन अधिकारी : जिल्हाधिकारी विक्रमकुमार
११.०० सभेला प्रारंभ आणि उमेदवारी अर्जांची छाननी
११. १५ अर्ज मागे घेण्यासाठी कालावधी प्रारंभ
११.३० अर्ज मागे घेण्याची मुदत संपणार
११.३० मैदानातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार
११.३५ हात उंचावून मतदानाला प्रारंभ
११.४५ ते दु.१२ मतदानाचा निकाल जाहीर करणार
विशेष सभेचा अजेंडा
२२ एप्रिलला मतदान आणि २३ एप्रिलला निकाल लागला. २९ एप्रिलच्या आत महापौराची निवड करणे बंधनकारक असल्याने २३ तारखेला विजयाचे प्रमाणपत्र घेतानाच विजयी उमेदवारांना महापौर निवडीच्या विशेष सभेचा अजेंडाही देण्यात आला. नंतर निवडणूक निकालाचे राजपत्रही प्रसिद्ध झाले.

चित्तेंना हुलकावणी
सेनेला नियंत्रणात ठेवण्यासाठी व सत्तावाटपात मोठा हिस्सा मागण्यासाठी भाजपने राजू शिंदेंना महापौरपदाचा अर्ज भरायला लावला. उपमहापौरपदासाठी नितीन चित्ते या निष्ठावानाच्या तोंडातील घास ओढून काँग्रेसमधून आलेल्या प्रमोद राठोडना उमेदवारी दिली. एमआयएमने महापौरपदावर दावा करीत गंगाधर ढगे या दलित नगरसेवकाला उमेदवारी दिली.
पुढे वाचा.... त्रिकोणी नव्हे, थेट लढत