आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad's 66 Candidates Future Today Close In Voting Machine

औरंगाबादच्या ६६ उमेदवारांची आज मतदान यंत्रांमध्‍ये होणार भवितव्य बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील पूर्व, पश्चिम व मध्य अशा तीन मतदारसंघांच्या ८६५ मतदान केंद्रांवर सुमारे साडेसात लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अतुल सावे, एम. एम. शेख, गंगाधर गाडे, संजय शिरसाट, राजेंद्र दर्डा, प्रदीप जैस्वाल, मधुकर सावंत, किशनचंद तनवाणी, डॉ. गफ्फार काद्री, इम्तियाज जलील यांच्यासह ६६ उमेदवार रिंगणात आहेत. यंदा औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्चिममध्ये प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यामुळे आपण कोणाला मतदान केले याची पावती मतदारांना मिळणार आहे.
औरंगाबाद पूर्वमध्ये २६१, पश्चिममध्ये ३११, मध्यमधे २९३ मतदान केंद्रे आहेत. सर्वच मतदारसंघांत किमान पंचरंगी लढती होणार असल्याने मतदारांना खेचण्यासाठी स्पर्धा होणार आहे. त्यातून भांडणे, वादावादी होण्याची चिन्हे असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहराच्या सर्व भागांमध्ये सुमारे सहा हजार पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. व्हीडिओ कैमे-याद्वारे मतदान प्रक्रियेवर नजर ठेवली जाणार आहे. नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी केले आहे.