आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलमंडी, सिटी चौकासह शहागंजमध्ये हाेणार कोंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तब्बल आठ वर्षानंतर ऑक्टोबर रोजी शहरात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी २० मोर्चे धडकणार आहेत. मुख्यमंत्री, मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी ११० शिष्टमंडळे जाणार आहेत. सहा संघटनांचे उपोषण असून दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला अाहे. मोर्चांमुळे सामान्य नागरिकांसाठी एकही रस्ता बंद राहणार नाही, असे पोलिसांनी सांगितले असले तरी मोर्चांचे मार्ग आणि त्यांना होणारी गर्दी, वाहनांची वर्दळ (काँग्रेसच्या मोर्चासाठी २५०० वाहने) लक्षात घेता शहागंज, फाजलपुरा, सिटी चौक, गुलमंडी, पैठण गेट, जुना बाजार, मिल कॉर्नर ते आमखास मैदान, दिल्ली गेट ते फाजलपुरा, पंचायत समिती ते जिल्हाधिकारी रस्त्यावर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत जाणे टाळणे किंवा दुसऱ्या मार्गाने जाणे नागरिकांसाठी उपयुक्त राहणार आहे.
सकाळी ११ ते दुपारी दीड वाजेपर्यंत पैठण गेट, गांधी पुतळा, मिलकॉर्नर, क्रांती चौक या भागातून निघणारे मोर्चे आमखास मैदानावर धडकणार आहेत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयासह सुभेदारी विश्रामगृहाच्या २०० मिटर परिसरात मोर्चास बंदी असल्याने मोर्चेकऱ्यांतील पाच ते दहा जणांच्या शिष्टमंडळाला सुभेदारी गेस्ट हाऊसच्या पाठीमागील बाजूच्या गेटने पास देऊन सोडले जाईल. निवेदन संबंधित खात्याचे मंत्री स्वीकारणार आहेत.
याभागात होणार वाहतूकीची कोंडी : सकाळी११ ते यावेळेत मोर्चे निघणार आहेत. ते ज्या रस्त्यावरून जातील तो तात्पुरता बंद केला जाईल. मंत्र्याच्या गाड्या ये-जा करतानाही अशीच स्थिती असेल. त्यामुळे शक्यतो वाहनधारकांनी या मोर्चा निघणाऱ्या रस्त्यांनी जाणे टाळावे, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त चंपालाल शेवगण यांनी केले.

अनेक मोर्चे धडकणार
(मोर्चे-मार्ग-वेळ-पोलिसांना अपेक्षित आंदोलकांची संख्या)
१.महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती - पैठणगेट सिटीचौक,काळा दरवाजा, आमखास मैदान. सकाळी ११- १०००
२. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी - शहागंज, सिटीचौक, सागर हॉटेल, आमखास मैदान-दुपारी २५ ते ३० हजार
३. राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना - मिलकॉर्नर,गुलमंडी,सिटीचौक ते आमखास मैदान-सकाळी ११:३०-२०००
४. महाराष्ट्र ज्युनियर कॉलेज अनुदान हक्ककृती समिती-मिलकॉर्नर, ते आमखास मैदान सकाळी ११-५००
५. महाराष्ट्र राज्य पर्यवेशिका संयुक्त कृती समिती - क्रांतीचौक, पैठणगेटमार्गे, मिलकॉर्नर ते आमखास मैदान. वेळ-सकाळी ११- १०००
६. महाराष्ट्र राज्य अध्यापक विद्यालय कर्मचारी संघटना-क्रांतीचौक ते आमखास मैदान-सकाळी११- ३०००
७. जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थानांचा संघ मर्यादित क्रांतीचौक ते आमखास मैदान,- दुपारी १२ -२०००
८. राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती-क्रांतीचौक ते आमखास मैदान वेळ दुपारी १२ - ३०००
९. भारतीय अदिवासी पँथर संघटना - भडकल गेट,टाऊन हॉल,आमखास मैदान वेळ दुपारी वाजता - १०००
१०. महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिकसंघ पैठणगेट,मिलकॉर्नर,आमखास मैदान वेळ दुपारी ११ वाजता - ५००
११. महाराष्ट्र वि.जा.भ.ज.माध्यमिक शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी अन्याय निवारण समिती - क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक,काळादरवाजा,आमखास मैदान वेळ दुपारी १२ वाजता --- १५००
१२ . राष्ट्रवादी काँग्रेस गंगापूर तालुका - मिलकॉर्नर,भडकलगेट,आमखास मैदान . वेळ दुपारी १२ वाजता -- ५००
१३ . मुप्टा महाराष्ट्र विनानअनुदानित शिक्षक शिक्षकेत्तर संघटना - क्रांतीचौक,पैठणगेट, काला दरवाजा, आमखास मैदान. वेळ सकाळी ११:३० --२५००
१४. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना - चंपाचौक ते आमखास मैदान वेळ सकाळी ११ वाजता --- २५०
१५. महाराष्ट्र राज्य औरंगाबाद विभागीय मजूर सहकारी संघ क्रांतीचौक ते आमखास मैदान . वेळ सकाळी ११ वाजता
१६. महाराष्ट्र राज्य बीएड,महाविद्यालय,प्राचार्य,प्राध्यापक,कर्मचारी विद्यार्थी कृती समिती - मिलकॉर्नर ते आमखास मैदान . वेळ दुपारी १:३० वाजता - ५००
१७. राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटना - अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून विभागीय आयुक्त कार्यालय - दुपारी वाजता - १०००
१८. शेतकरी हक्क बचाव कृती समिती - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते आमखास मैदान - दुपारी एक वाजता - २५०
१९. भटके सेवा भावी संस्था - सकाळी ११ वाजता - क्रांती चौक ते आमखास मैदान -- २००
२०. मराठवाडा लेबर युनियन - दुपारी एक वाजता - मिलकॉर्नर - आमखास मैदान - १०००
२१. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक - दुपारी बारा बाजता, औरंगपुरा ते चेलीपूरा - संख्या २००० असे २१ मोर्चे धडकणार आहेत.
या मार्गावर जाणे टाळा
Áपैठणगेट,सिटी चौक रंगीन गेट, आमखास मैदान रस्ता
Áहर्सूलटी पॉइंट ते दिल्ली गेट
Áटीव्हीसेंटर, गणेश कॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालय
Áशहागंज,लेबर कॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालय
Áटाऊनहॉल ते आमखास मैदान रोड
Áभडकलगेट, टाऊन हॉलचा उड्डाणपूल ते आमखास मैदान
Áक्रांतीचौक, पैठण गेट ते आमखास मैदान
Áमिलकॉर्नर ते आमखास मैदान

शहरात स्वागतासाठी होर्डिंग्जची स्पर्धा
मुख्यमंत्री, मंत्र्याच्या स्वागतासाठी हजाराे रुपये खर्चून होर्डिंग्ज लावण्याची स्पर्धाच कार्यकर्त्यांमध्ये लागली. जळगाव रोड, जालना रोड, सुभेदारी परिसर, विमानतळ या भागात विद्युत खांब, दुभाजकांवर बॅनर लावण्याचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

गणेशोत्सवापेक्षा जास्त पाेलिस बंदोबस्त
गणेश उत्सवाच्या दरम्यान सुमारे तीन हजारांचा बंदोबस्त तैनात होता मात्र या बैठकीसाठी सहा पोलिस उपायुक्त ,१५०० अधिकारी, कर्मचारी तर स्थानिक २००० पोलिस अधिकारी कर्मचारी राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या असा चार हजारांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत पावसाची शक्यता नाही, असे हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

बैठक | सकाळी ११ ते दु. २.३०पर्यंत
सकाळी ११ वाजता बैठकीला प्रारंभ होणार असून ती दुपारी अडीचपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची सविस्तर माहिती देतील. विविध मंत्री बैठक संपल्यावर त्यांच्या खात्यांच्या आढावा बैठका तसेच कार्यक्रमांना उपस्थित राहून सायंकाळी साडेसहा वाजता मुंबईकडे रवाना होतील.

मुख्यमंत्र्यांचा दौरा असा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी साडेदहा वाजता औरंगाबादेत येतील. १० वाजून ५५ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात येऊन अकरा वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहतील. रात्री आठ वाजता आमदार अतुल सावे यांच्या घरी भोजन आणि त्यानंतर मुंबईकडे प्रयाण करतील.
पोलिस म्हणतात : एकही रस्ता बंद नाही... तरीहीमोर्चांचे मार्ग लक्षात घेता शहागंज, फाजलपुरा, सिटी चौक, गुलमंडी, पैठण गेट, जुना बाजार, मिल कॉर्नर ते आमखास मैदान, दिल्ली गेट ते फाजलपुरा, पंचायत समिती ते जिल्हाधिकारी रस्त्यावर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत जाणे टाळा
बातम्या आणखी आहेत...