आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडपीठाच्या वर्धापन दिनाला आज मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद खंडपीठाच्या ३५ व्या वर्धापन दिन सोहळ्याला रविवारी (२८ ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लूर, न्यायमूर्ती विजया ताहिलरामानी यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे उपस्थित राहण्याचे आवाहन वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रदीप पाटील, उपाध्यक्ष अॅड. राहुल तांबे, सचिव अॅड. बलभीम केदार यांनी केले आहे.

खंडपीठाच्या कार्यकक्षेत मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव हे जिल्हेही येतात. त्यामुळे वर्धापन दिनाच्या साेहळ्यास या जिल्ह्यांमधील अनेक दिग्गज विधिज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली अाहेे.
बातम्या आणखी आहेत...