आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आज परिसंवादाचे आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्र व जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार(१६ नोव्हेंबर) रोजी सकाळी ११ वाजता मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी सभागृहात "सार्वजनिक कामकाजात पारदर्शकता : माध्यमांची भूमिका' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद््घाटन खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते होणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे अध्यक्षस्थानी उपस्थित राहतील. कार्यक्रमाला वक्ते म्हणून उपायुक्त डॉ. विजयकुमार फड, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे अधिव्याख्याता डॉ. वि. ल. धारूरकर व पत्रकार सुशील कुलकर्णी यांची उपस्थिती असेल. "दिव्य मराठी'चे निवासी संपादक दीपक पटवे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार सुधीर महाजन, संजय वरकड, एस. एस. नक्षबंदी, फय्याज अहमद कुरेशी व एस. के. बावस्कर यांची प्रमुख उपस्थिती असेल.