आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांच्या उपस्थितीत आज एमजीएममध्‍ये पदवीप्रदान सोहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमजीएम युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस या अभिमत विद्यापीठाचा पाचवा पदवीप्रदान सोहळा शनिवारी (२७ जून) सकाळी १० वाजता रुक्मिणी सभागृहात होत आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची उपस्थिती राहील, अशी माहिती एमजीएमचे सर्वेसर्वा कमलकिशोर कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

समारंभाविषयी माहिती देताना कदम म्हणाले की, शरद पवार यांना आम्ही डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित करत आहोत. कृषी, वैद्यकीय आणि महिला सबलीकरण याविषयात त्यांचे योगदान अतुलनीय आहे, याची दखल घेऊन आम्ही पदवी प्रदान करत आहोत. या वेळी अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. के. जी. नारायणखेडकर यांची उपस्थिती राहील.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर कदम म्हणाले, या समारंभात ३६२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तर मेडिकल, फिजिओथेरपी, नर्सिंग, आयुर्विज्ञानच्या ५६२, एमडी एमएसच्या १२६, एमबीबीएसच्या २०४ तर पीएचडीच्या ५ आणि १ हृदयविकारातील डीएम पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, अधिष्ठाता डॉ. अजित श्रॉफ, विश्वस्त प्रतापराव बोराडे,डॉ. नितीन कदम उपस्थित होते.

गांधेली कृषी विज्ञान केंद्राचे उद‌्घाटन
पदवीप्रदान समारंभापूर्वी सकाळी ८ वाजता एमजीएमच्या गांधेली येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तसेच एमजीएम क्रीडा संकुलाच्या मुख्य इमारतीचे उद‌्घाटनही पवार यांच्या हस्ते होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...