आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Divya Property Expo Inaugarate, 26 Farms Participate

'दिव्य प्रॉपर्टी एक्स्पो'चे आज उद्घाटन; २६ फर्म सहभागी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - राजग्रुप प्रस्तुत आणि आैरंगाबाद क्रेडाई 'दिव्य मराठी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'दिव्य प्रॉपर्टी एक्स्पो'चे उद्घाटन शुक्रवारी (२९ एप्रिल) सकाळी ११ वाजता करण्यात येत आहे. २९ एप्रिल ते मेपर्यंत जुने बिग बाजार कॉम्प्लेक्स, मोतीवाला स्क्वेअर, आकाशवाणी चौक येथे हे गृहप्रदर्शन भरवले जात आहे. एक्स्पोचे उद्घाटन क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, आैरंगाबाद क्रेडाईचे अध्यक्ष एस. एस. पाटील, सचिव विकास चौधरी, क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा आण राज ग्रुपचे संचालक रामेश्वर भारुका आदींच्या हस्ते करण्यात येईल.

प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये राज ग्रुप, नाभराज ग्रुप, विकास डेव्हलपर्स, गजानन लँड डेव्हलपर्स, जय डेव्हलपर्स, सारा ग्रुप, फेथ बिल्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि., पेन्ट हाऊस बिल्डर्स, पतंजली, पाल्म्स रिअॅलिटी, स्टेट बँक ऑफ इंडिया, मालगे मॅजेस्टिक, एस ग्रुप, किमया इन्फ्रास्ट्रक्चर , वेदान्त किचन सर्व्हिस, अरुण इलेक्ट्रॉनिक्स, सारथी व्हेंचर्स प्रा. लि. , आर्च डेव्हलपर्स, श्री श्री बालाजी लँड डेव्हलपर्स, मराठवाडा कन्स्ट्रक्शन प्रा. लि., अमृत डेव्हलपर्स, कल्याणी बिल्डर्स, दिशा ग्रुप, सरदार कन्स्ट्रक्शन कंपनी, साऊथ रिपब्लिक प्राइड ग्रुप आदींचा सहभाग राहणार आहे.