आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ड्रीम होम’ प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस, ५०० घरे बुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - घर आणि घरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली मिळत असल्याने मोतीवाला स्क्वेअर, जुने बिग बाजार येथील ‘ड्रीम होम’ प्रदर्शनाला नक्की भेट द्या, असे आवाहन क्रेडाईचे सचिव विकास चौधरी यांनी केले आहे. प्रदर्शनाला दररोज १२०० ते १५०० लोक भेट देत असून चार दिवसांमध्ये जवळपास ५०० जणांनी घराची बुकिंग केली आहे. रविवारी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी हा आकडा आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
११० स्टॉल्सद्वारे ‘ड्रीम होम-२०१६’ प्रदर्शनात नामवंत बिल्डर, वित्तीय संस्था, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गृह सजावट साहित्य, किचन ट्रॉली, बँक लोन, बांधकाम परवाना आदींबाबतची सर्व माहिती देत आहेत. प्रदर्शनाचे यंदाचे खास वैशिष्ट्य सॉफ्टवेअरद्वारे ग्राहकांची नोंदणी होत असून एसएमएसने माहिती मिळते. बारकोडमुळे कोणत्याही स्टॉलवर नाव सांगताच योग्य प्रकल्पाची माहिती नागरिकांना दिली जाते. प्रत्येक स्टॉलवर एलसीडी स्क्रीन, प्रदर्शनाची मांडणी, सजावट बांधकाम व्यावसायिकांच्या नव्या पिढीने आकर्षक बनविली आहे.

स्टॉल्स पाहत शेवटी पार्किंगमध्ये उतरण्याची व्यवस्था आहे. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मनपाच्या स्टॉलवर बांधकाम परवानगी कशी मिळवायची इथपासून ते मालमत्ता करापर्यंतची माहिती मिळते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमधून दररोज लकी ड्रॉ पद्धतीने पाच भाग्यवंतांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येते.

प्रदर्शन यशस्वितेसाठी क्रेडाई अध्यक्ष सुनील पाटील, सचिव विकास चौधरी, समन्वयक रवी वट्टमवार, सहसमन्वयक संग्राम पटारे, आशुतोष नावंदर, विजय सक्करवार, सुनील बेदमुथा, जुगलकिशोर तापडिया, राजेंद्रसिंग जबिंदा, जितेंद्र मुथा, देवानंद कोटगिरे, प्रकाश मालखरे, संजय कासलीवाल, प्रमोद खैरनार, पापालाल गाेयल, बाळकृष्ण भाकरे, नितीन बगाडिया, नरेंद्रसिंग जबिंदा, अनिल मुनोत, भास्कर चौधरी, सचिन बोहरा, रामेश्वर भारूका, अनिल अग्रहारकर, मनोज पगारिया, अखिल खन्ना, गोपेश यादव, मनोज काला, सिद्धार्थ कांकरिया, मधुसूदन उत्तरवार, नीळकंठ नागपाल, अर्चित भारूका, नीलेश अग्रवाल, अंकित अग्रवाल, बालाजी येरावार, उदय कासलीवाल, अखिल भालेकर, जयशील भालेकर, समीर सोनवणे आदींनी पुढाकार घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...