आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलसचिव आज निवडणार, विद्यापीठात लेखी परीक्षेनंतर उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी उद्या (२२ जुलै) लेखी परीक्षा घेतली जाणार असून त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. त्यासंबंधी उमेदवारांना पत्रेदेखील पाठवण्यात आली आहेत.

विद्यापीठाचे कुलसचिव पद गेल्या सात-आठ महिन्यांपासून रिक्त आहे. आतापर्यंत तीन वेळेस या पदावर प्रभारी अधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे. डाॅ. धनराज माने यांची उच्च शिक्षण संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त आहे. या पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. सुरुवातीला जाहिरात काढूनही योग्य उमेदवार न मिळाल्याने मुलाखती रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जूनमध्ये पुन्हा जाहिरात देऊन अर्ज मागवण्यात आले होते; परंतु आम्ही परीक्षा देणार नाही, असे म्हणत अनेक उमेदवारांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला होता.
आता पुन्हा एकदा कुलसचिव पदावर योग्य व्यक्तीची वर्णी लागावी, यासाठी उद्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यासाठी सकाळी पात्रता परीक्षा होईल. त्यातून पात्र उमेदवारांच्या मुलाखती होऊन एकाची निवड केली जाणार आहे. २१ उमेदवारांना मुलाखत पत्रे पाठवली आहेत.

हे आहेत शर्यतीत
कुलसचिव पदाच्या शर्यतीत अनेक जण इच्छुक असून त्यापैकी डॉ. यशवंत खिल्लारे, डॉ. प्रदीप दुबे, डॉ. प्रदीप जब्दे, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. ईश्वर मंझा, डॉ. गणी पटेल यासह अन्य काही जणांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...