आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवेसीच्या प्रवेशबंदीबाबत आज सुनावणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकऔरंगाबाद - ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलमिनचे (एमआयएम) अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या औरंगाबाद प्रवेशबंदीप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी खंडपीठात शपथपत्र दाखल केले. बुधवारी पुढील सुनावणी होत आहे. दरम्यान, ओवेसी यांनीही खंडपीठात प्रवेशबंदीविरुद्ध याचिका दाखल केली आहे.

ओवेसी यांच्या जाहीर सभेस तसेच शहर आयुक्तालयाच्या हद्दीत प्रतिबंध केला होता. एमआयएम स्वागत समितीचे समन्वयक जावेद कुरेशी आणि अन्वर कादरी यांनी या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर पोलिसांना मंगळवारी शपथपत्र दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मंगळवारी पोलिसांनी 25 पानी शपथपत्र दाखल केले.
यात औरंगाबादेत 2010 ते 2012 पर्यंत झालेल्या जातीय तणावाची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांच्या वतीने सरकारी वकील एस. व्ही. कुरुंदकर तर याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. एस. एस. काझी बाजू मांडत आहेत.

आवेसींचीही याचिका
ओवेसी यांनीही सोमवारी (4 फेबु्रवारी) अ‍ॅड. एस. एस. काझी यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी प्रतिबंध करणे कलम 19, 21 आणि 25 चे उल्लंघन असून यामुळे खुलताबादला दर्शनाला जाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी याचिकेत नमूद केले आहे.