आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Is Last Day For Aurangabad Corporation Election Campain

पालिका निवडणूक - मुस्लिमबहुल भागात अद्यापही चित्र धुसर..!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुस्लिम बहुल वॉर्डांत प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, समाजवादी पक्ष, अपक्ष अशा विविध पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक वॉर्डात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह किमान आठ ते दहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे निकालाचे नेमके चित्र स्पष्ट होत नाही.

आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी वॉर्ड क्रमांक १९ मध्ये अपक्ष अलीम खान वाहेद लाला यांच्यामध्ये लढत आहे. जयभीमनगर, घाटी परिसर वॉर्ड क्रमांक २० मध्ये काँगेसचे लईक शेख एमआयएमचे सय्यद मतीन, बुढीलाइन-कबाडीपुरा वॉर्ड क्रमांक २१ मध्ये काँग्रेसचे राणा कौसर एमआयएमच्या शकिला बेगम यांच्यामध्ये चुरस आहे. चेलीपुरा-काचीवाडा वॉर्ड क्रमांक २३ मध्ये काँग्रेसच्या शेख जाकेरा एमआयएमच्या शकिला बेगम यांच्यात खरी लढत आहे.

शहाबाजार वॉर्ड क्रमांक २४ मध्ये काँग्रेसच्या बिल्कीस बेगम मीर हिदायत अली एमआयएमच्या सरवत फातेमा यांच्यामध्ये खरी लढत आहे. गणेश कॉलनी वॉर्ड क्रमांक २५ मध्ये काँग्रेसचे नदीम मस्तान एमआयएमचे नसिरोद्दीन सिद्दिकी, नेहरूनगर वॉर्ड क्रमांक २६ मध्ये मेहरुन्निसा खान नर्गिस अंजुम यांच्यात लढत आहे. शताब्दीनगर वॉर्ड क्रमांक २७ मध्ये मोमीन अजीज रद्दा एमआयएमचे जहांगीर खान ऊर्फ अज्जू पहेलवान यांच्यात चुरशीची लढत होईल, असे जाणकार सांगतात. रहेमानिया कॉलनी वॉर्ड क्रमांक ४१ मध्ये रमजानी खान एमआयएमचे हाजी इर्शाद खान, शरीफ कॉलनी वॉर्ड क्रमांक ४३ मध्ये काँग्रेसचे मोमीन इसाक अंडेवाला एमआयएमचे निसार अहेमद खान यांच्यात लढत आहे. रोशन गेट वॉर्ड क्रमांक ४४ मध्ये काँग्रेसच्या करिमुन्निसा जमील खान एमआयएमच्या अन्सारी साजेदा, कैसर कॉलनी वॉर्ड क्रमांक ४५ मध्ये काँग्रेसच्या कमरुन्निसा शाहिद अहेमद एमआयएमच्या शाहेद बेगम, बॉरी कॉलनी वॉर्ड क्रमांक ५८ मध्ये शेख सोफिया बेगम मुनाफ एमआयएमच्या अस्मा पठाण, इंदिरानगर दक्षिण- बायजीपुरा वॉर्ड क्रमांक ५९ मध्ये माजेद खान, एमआयएमचे मोहंमद रियाजुद्दीन यांच्यात लढत आहे.
इंदिरानगर उत्तर बायजीपुरा वॉर्ड क्रमांक ६० मध्ये काँग्रेसचे सय्यद नूर एमआयएमचे जफर शेख, राष्ट्रवादीचे सलीम पटेल, अपक्ष अबू बकर अमोदी अशी लढत होत आहे. अल्तमश कॉलनी वॉर्ड क्रमांक ६१ मध्ये काँग्रेसचे शेख इब्राहिम एमआयएमचे अय्युब जहागीरदार यांच्यात लढत आहे.

सहज उपलब्ध होणाऱ्या उमेदवाराला महत्त्व

एमआयएमला अंतर्गत वादाचा फटका बसू शकतो, अशी चिन्हे आहेत. याचा फायदा घेऊन काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मुस्लिमबहुल वॉर्डांत सर्व राजकीय पक्षांची परिस्थिती पाहता निकाल एकाच पक्षाच्या बाजूने लागतील असे वाटत नाही. काँग्रेस, एमआयएमचे नेते सभा घेत आहेत. मतदारांना भावनिक साद घालण्यात येत आहे. मतदार मात्र, दररोज उपयोगी पडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या उमेदवाराला मतदार जास्त महत्त्व देत आहेत.