आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक स्थळांच्या आक्षेपांवर आज बैठक, जिल्हाधिकारी, CP राहणार उपस्थित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध करून त्यावर आक्षेप मागवण्यात आले होते. त्यानुसार जुने ८०६ आणि नवीन ११०० आक्षेप आले आहेत. यावर सुनावणी कधी घ्यायची याचे नियोजन २१ ऑगस्ट रोजी विशेष बैठकीत करण्यात येणार आहे. या बैठकीस पहिल्यांदाच जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पोलिस आयुक्त यशस्वी यादव उपस्थित राहणार आहेत. 

मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी वाजता आमखास मैदान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बैठक होणार आहे. धार्मिक स्थळांवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती गठित केली आहे. सात ऑगस्टपासून न्यायालयाच्या आदेशान्वये झालेल्या बैठकांना जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त गैरहजर होते. १८ ऑगस्ट रोजीच्या सुनावणीत उच्च न्यायालयासमोर मनपाने तसा अहवाल सादर केला. त्यावर न्यायालयाने जिल्हाधिकारी पोलिस आयुक्तांना चांगलेच फटकारले. दोन्हीही अधिकाऱ्यांनी कोर्टात माफीनामा सादर केला होता. आजच्या बैठकीत धार्मिक स्थळांच्या यादीवर आलेल्या आक्षेपांच्या सुनावणीची रूपरेषा ठरणार आहे.

पथकांची संख्या ठरणार
याबैठकीत कोणत्या आक्षेपांवर कारवाई करायची तसेच अतिक्रमण पाडण्यासाठी किती पथके असतील याचेही नियोजन करण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...