आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी आज अंतिम मुदत, 26 जुलैपासून सुरू होणार वर्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रथमच होत असलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत वारंवार माहिती देऊनही शाळा-कॉलेजांमध्ये होणारा गोंधळ कायम असून, विद्यार्थ्यांचा गोंधळ दूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय प्रयत्नही करत आहे. तरीही विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मंगळवार (२७ जून) ऑनलाइन नोंदणीसाठीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे झोन केंद्रावर सोमवारी सकाळीच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
 
पुणे-मुंबईच्या धरतीवर यंदा औरंगाबाद शहरातही अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे हे पहिलेच वर्ष आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने नुकतेच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जूनपासून सुरू झालेली ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया मंगळवारी (२७ जून) सायंकाळपर्यंतच सुरू असणार आहे.
 
अशी आहे प्रक्रिया
२८जून रोजी कॉलेज कोड, शाखानिहाय रिक्त जागांसह गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. २८ २९ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालये कनिष्ठ महाविद्यालयांनी कॉलेज कोडनिहाय पूर्ण शुल्क घेऊन प्रवेश करून ती माहिती संकेतस्थळावर अपडेट करायची आहे. २९ जून रोजी पहिल्या फेरीनंतरच्या कोटा प्रवेशातील रिक्त जागा ऑनलाइन कॉलेजांनी सायंकाळी वाजेपर्यंत कळवायच्या आहेत.

याच दिवशी सायंकाळी वाजता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती तपासणीसाठी ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ३० जून रोजी विद्यार्थ्यांच्या अर्जातील त्रुटी, हरकती मार्गदर्शन केंद्रांवर लेखी स्वरूपात स्वीकारल्या जातील. त्या अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ३० जून रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. जुलै रोजी रिक्त जागा कॉलेज लॉगइनमधून ऑनलाइन सरेंडर करता येतील. जुलै रोजी केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. ते जुलै रोजी सायंकाळी वाजेपर्यंत केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश करता येतील.
 
जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील पहिल्या फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. जुलै रोजी विद्यार्थ्यांना भाग दोन अर्जात पसंतीक्रम बदल असल्यास भरता येईल. १३ जुलै रोजी प्रवेशाची दुसरी केंद्रीय गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. या यादीतील प्रवेश १४ जुलैपर्यंत करता येतील. १५ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील दुसऱ्या फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. १६ १६ जुलै रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भाग दोनमधील पसंतीक्रम बदलता येईल. १९ जुलै रोजी तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. याचे प्रवेश १९ २० जुलै रोजी करायचे आहेत.
 
२६ जुलैपासून सुरू होणार वर्ग
२१जुलै रोजी तिसऱ्या फेरीतील कट ऑफ जाहीर करण्यात येईल. २१ २२ जुलै रोजी तिसऱ्या फेरीसाठीचा विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरायचा असल्यास सायंकाळी वाजेपर्यंत भरता येईल. २४ जुलै रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहीर होईल. यातील विद्यार्थ्यांनी २४ २५ जुलै रोजी चौथ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश करता येतील. २६ जुलैपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू होतील, असे केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने कळवले आहे.
बातम्या आणखी आहेत...