आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महास्वच्छता अभियान आज कॅनॉट परिसरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिडको कॅनॉट परिसरात रविवारी (८ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजेपासून महास्वच्छता अभियानास सुरुवात होणार आहे. "दिव्य मराठी'सह या भागातील व्यापारी संघटना व नागरिकांनी अभियानाची जय्यत तयारी केली आहे.

'दिव्य मराठी', सिडको कॅनॉट व्यापारी संघटना आणि नागरिकांच्या सहकार्याने महास्वच्छता अभियान होणार आहे. दोन दिवसांपूर्वी गरवारे कम्युनिटी सेंटरच्या वतीने बच्चे कंपनीने तेथे जाऊन स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले तसेच रॅली काढून या अभियानाचे महत्त्व पटवून दिले होते. गोळा झालेला कचरा घेण्यासाठी इंदिरानगर येथून कचरावेचक महिला येणार आहेत. अभियानाबाबत उत्साही असल्याचे ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, योगेश झवेरी, अनिल सालोमन म्हणाले. या अभियानात तुकाराम नन्नवरे, संतोष मुथा, विवेक येवले, नारायण पारटकर, दीपक जैन, सागर सारडा, संतोष खर्डे, समीर शिवानी, अरुण मंगरुळे, नंदू कवरे, देवेंद्र जावळे, प्रमोद नगरकर, गोपाळ खंडेलवाल, राजू वासवाणी, भावेश रंगवाणी, राम दाभाडे, राजू गुरव, कल्पना गुरव, स्वाती स्मार्थ, लता गुंजरगे, उज्ज्वला अवघड पाटील, वैशाली येवले, मीनाक्षी डायगव्हाणे, कांता खंडेलवाल, वर्षा पोहेकर, अंजली गोरे, वृषाली चव्हाण सहभागी होणार आहेत.

नियोजनबद्ध तयारी
आज होणा-या या अभियानाची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तयारी झाली असून नागरिकांनी कचरा गोळा करण्यासाठी स्वत:च्या घरातून पोती आणावीत, जेणेकरून कचरा साठवून तो एका जागी ठेवता येईल.

चित्रकला स्पर्धा
या अभियानात सहभागी होणा-या लहान मुलांसाठी उद्यानात चित्रकला स्पर्धा होईल. यात "स्वच्छ परिसर सुंदर परिसर' या विषयावर मुलांनी चित्रे काढायची आहेत. मुलांनी ड्रॉइंग पेपरसह रंगाचे सामानही आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सीआरटीचे प्रेझेंटेशन
कच-याचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सीआरटी टीमच्या सदस्या सनवीर छाबडा, स्नेहा बक्षी, गौरी मिराशी यांचे सायंकाळी ५.३० वाजता कॅनॉट भागातील एका हॉलमध्ये प्रेझेंटेशन होणार आहे.