आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्यायी पाणीवाटपावर आज तीन विभागांची बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणीवाटपाची बैठक उद्या १७ ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीत नगर, नाशिक आणि औरंगाबादचे अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडीचा पाणीसाठा ८२ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यामुळे वरच्या धरणातून जायकवाडीला पाणी मिळण्याची शक्यता नाही.
सोमवारी दुपारी तीन वाजता गोदावरी पाटबंधारे महामंडळात ही बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत केवळ नगर आणि नाशिकमध्ये खरिपासाठी केलेल्या पाण्याच्या वापराचा हिशेब केला जाणार आहे. नगरमध्ये कालव्याच्या माध्यमातून अनेकदा पाणी देण्यात आले. त्यातच कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातूनही खरिपासाठी पाणी सोडण्यात आले होते.

ऊर्ध्व भागातील धरणांत १०० टक्के पाणीसाठा
गोदावरीच्या ऊर्ध्व भागातील २१ धरणांत उपयुक्त पाणीसाठा २२३६ दलघमी झाला आहे. यामध्ये जायकवाडीच्या वरच्या भागातील धरणे शंभर टक्के भरली आहेत. यामध्ये भंडारदरा, मुळा, करंजवण, पालखेड, कडवा, वाघाड, दारणा आणि भावली १०० टक्के, ओझरखेड ९९.९९, गंगापूर ९५.८६, गौतमी ९३.०३, कश्यपी ९९.४३, मुकणे ७३.७३, नांदूर मधमेश्वर ९६.५०, निळवंडे ९७.५० टक्के भरले आहेत. पुणगाव, तिसगाव, वालादेवी, आढाळा हे प्रकल्पही भरले आहेत.
बातम्या आणखी आहेत...