आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील ४६ केंद्रांवर आज एमएचटी-सीईटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नॅशनलइ लिजिबिलिटी अँड एंट्रन्स टेस्ट म्हणजेच ‘नीट’च्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याची एमएचटी-सीईटी २०१६ परीक्षा होत आहे. जिल्ह्यातील १७ हजार २७३ परीक्षार्थींसाठी शहरातील विविध ४६ कॉलेजांची परीक्षा केंद्रे सुनिश्चित करण्यात आली आहेत. परीक्षा प्रवेशपत्र, अन्य एक ओळखपत्र, पॅड आणि फक्त काळ्या शाईचा बॉल पेन परीक्षार्थींनी सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी होणाऱ्या सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘नीट’मधून महाराष्ट्र राज्याला सूट द्यावी म्हणून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे. या याचिकेतील सुनावणी (५ मे) दुपारीच होणार आहे, तरीही पूर्व नियोजित एमएचटी-सीईटी परीक्षा गुरुवारी होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील परीक्षार्थींसाठी ४६ केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. दिवसभर चालणाऱ्या सीईटीमध्ये एकूण तीन पेपर होणार आहेत. सकाळच्या सत्रात ९.१५ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे. त्यानंतर १० ते ११.३० पर्यंत पहिला पेपर होईल. दुसरा पेपर दुपारी १२.३० ते १.३० दरम्यान होणार आहे. उपाहारानंतर ते ४.३० पर्यंत तिसरा आणि अंतिम पेपर होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना २.१५ पर्यंत परीक्षा केंद्रावर येणे गरजेचे आहे. लिहिण्यासाठी पॅड, काळा शाईचा बॉलपेन, परीक्षा प्रवेशपत्रासोबत एक कुठलेही ओळखपत्र सोबत बाळगणे गरजेचे आहे. त्याशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही. मोबाइल, कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट, कॅल्क्युलेटर, गिअर वॉच असणाऱ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे परीक्षा संपर्कप्रमुख, घाटीचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, डॉ. अजित दामले, डॉ. एम. एस. बेग यांनी कळवले आहे.
बातम्या आणखी आहेत...