आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Muktisangram Museum Open, Uddhav Thackeray Will Present

आज मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे लोकार्पण, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबाद दौ-यावर असून पालिकेच्या वतीने सिद्धार्थ उद्यानात उभारण्यात आलेल्या हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा सायंकाळी ५ वाजता त्यांच्या हस्ते होणार असल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या संग्रहालयात मुक्तिलढ्याची माहिती असलेली पुस्तके, छायाचित्रे, दुर्मिळ साहित्य, ३१ सचित्र पॅनल्स, ३८ स्वातंत्र्यसैनिकांची माहिती असून आणखी माहिती उपलब्ध करण्याचे काम यापुढेही सुरू राहणार आहे. या कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री रामदास कदम यांच्यासह युतीचे मराठवाड्यातील आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत.

स्व. ठाकरे रस्त्याचे लोकार्पण: दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत क्रांती चौक ते रेल्वेस्थानक या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे रस्त्याचेही लोकार्पण होणार आहे. गेल्या आठवड्यात आदित्य ठाकरे यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. पत्रकार परिषदेस महापौर कला ओझा, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले उपस्थित होते.