आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Municipal Corporation Submit Planning Of Smart City To State Government

ग्रीनफील्ड नक्षत्रवाडीत! महापालिका आज स्मार्ट सिटीचा आराखडा राज्य सरकारला सादर करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्टसिटीचा आराखडा फोट्रेस-नाइट फ्रँकने तयार केला असून तो उद्या राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. औरंगाबादच्या आराखड्यात ग्रीनफील्ड सिटीचा प्रकल्प घेण्याचा मानस आहे. चिकलठाणा की नक्षत्रवाडी ही रस्सीखेच जवळपास संपली असून नक्षत्रवाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आता स्मार्ट सिटीबाबतच्या राज्य सरकारच्या पातळीवरील समितीच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

जून महिन्यापासून सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या शर्यतीचा एक टप्पा आता संपत असून खरी शर्यत आता यापुढेच आहे. नागरिकांची मते विचारात घेऊन फोट्रेस-नाइट फ्रँक या प्रकल्प सल्लागार संस्थेने औरंगाबादचा आराखडा तयार केला आहे. रिट्रोफिटिंग, रिडेव्हलपमेंट, ग्रीनफील्ड या तीनपैकी आधी रिडेव्हलपमेंटवर विचार करण्यात आला. त्यात गरमपाणी भागातील मिल काॅर्नरचा टापूही निवडण्यात आला होता. पण अनंत अडचणींचा विचार करून ग्रीनफील्डवर भर देण्यात आला. त्यातही चिकलठाणा की नक्षत्रवाडी, असा पेच कायम होता. आता हा आराखडा तयार झाला असून त्यात नक्षत्रवाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीचा आराखडा सादर करण्याची उद्या शेवटची तारीख असून उद्या मुंबईत औरंगाबादचा आराखडा सरकारकडे सादर केला जाणार आहे.

संभ्रम कायम
दरम्यान,सूत्रांनी सांगितले की, राज्य सरकारने नेमका कोणत्या प्रकारे आराखडा द्यावा, असे नमूद केले नसल्याने उद्या सरकारने तशा सूचना दिल्यास त्यानुसार आराखडा तयार केला जाईल. अशा संभ्रमातच उद्या आराखडा सादर केला जाणार आहे.

- यासाठी मनपाला जमिनीचा वापर बदलणे, विकास नियमावलीत बदल करणे, गरज पडल्यास टीडीआर लागू करणे, करसवलती देणे आदी कामे करावी लागणार आहेत.

ग्रीनफील्डवर नजर
>कांचनवाडीजवळ बेंचमार्कच्या समोर असलेली ५५५ एकर जागा प्रकल्पासाठी अपेक्षित.
>५५५ एकरपैकी ११२ एकर जागा सरकारी गायरान जमीन.
>पैठण रोडवरील ही जागा शेंद्रा-बिडकीन कॉरिडॉरच्या जवळची.
>बिडकीन औद्योगिक वसाहत डीएमआयसीजवळ असल्याने या भागाच्या विकासाला संधी.
>सरकारच्या मालकीची जमीन अधिक असल्याने भूसंपादनाचा त्रास बऱ्यापैकी कमी होणार.