आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज मुस्लिम आरक्षणासाठी आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मूकमोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : मुस्लिम आरक्षणासाठी शुक्रवारी (६ जानेवारी) दोन वाजता आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढला जाणार आहे. गुरुवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, आमदार इम्तियाज जलील, कृती समितीचे इलियास किरमाणी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठ तयारीची पाहणी केली. 
 
पोलिस आयुक्तांनी विद्यार्थी उद्या देणार असलेल्या भाषणाची प्रतही त्यांनी तपासली. पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. यात एक पोलिस उपायुक्त, पाच स्ट्रायकिंग फोर्स, सहा सहायक पोलिस आयुक्त, २३ पोलिस निरीक्षक, ७७ सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ९२० पुरुष कर्मचारी, ७३ महिला पोलिस कर्मचारी आणि १७ व्हिडिओ कॅमेऱ्यांचा समावेश आहे. 
 
वाहतुकीत बदल : मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. दुपारी ते सायंकाळी ७.३० दरम्यान मिलकॉर्नर, ज्युबिली पार्क, आमखास मैदान, किलेअर्क, अण्णाभाऊ साठे चौक, विभागीय आयुक्त कार्यालयाचा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...