आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दिव्य मराठी’चे 'ऑटो एक्स्पो २०१६' प्रदर्शन आजपासून सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नवीन चारचाकी, दुचाकी घेण्याचे नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात यावे यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित ऑटो एक्स्पो २०१६ प्रदर्शनास १७ मार्चपासून प्रारंभ होत आहे. २० मार्चपर्यंत तापडिया-कासलीवाल मैदानावार होणाऱ्या या प्रदर्शनात औरंगाबादकरांना नामवंत कंपन्यांच्या सर्वोत्तम दुचाकी, चारचाकी एकाच छताखाली पाहण्यास मिळणार आहेत.

शहरातील वेगवेगळ्या भागांतील दालनात जाऊन आपल्या पसंतीचे वाहन पाहणे, त्यातील बारकावे जाणून घेणे, गरज असल्यास कर्जासाठी एखाद्या बँक-संस्थेकडे जाणे, अशी बरीच धावपळ असते. ती टाळण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. चेंबर ऑफ ऑथराइज्ड ऑटोमोबाइल डीलर्स, सोहम ह्युंदाई तसेच फोक्सवॅगन औरंगाबाद, गिरिजा मोटर्स महिंद्रा फर्स्ट चॉइसच्या सहकार्याने होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद््घाटन १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ऑटो एक्स्पर्ट टुटू धवन, आमदार सुभाष झांबड, ऑटोमोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष मनीष धूत यांच्या उपस्थितीत होणार आहे.

टुटू धवन मर्सिडीझची रॅली
गुरुवारी सकाळी ११.३० वाजता तापडिया कासलीवाल मैदान येथून मर्सिडीझ कारची भव्य रॅली निघणार आहे. विवेकानंद महाविद्यालय, निराला बाजार, गुलमंडी, सिटी चौक, हडको कॉर्नर, टीव्ही सेंटर चौक, कॅनॉट प्लेस, सिडको बसस्थानक, हनुमाननगर, गजानन महाराज मंदिर, सूतगिरणी चौक, एकता चौक, त्रिमूर्ती चौक, आकाशवाणी, क्रांती चौक, रेल्वेस्टेशन, पंचवटी चौक, तापडिया-कासलीवाल मैदान असा रॅलीचा मार्ग राहणार आहे.

डीसी अवंतीचे आकर्षण
ऑटो इंडस्ट्रीमधील प्रख्यात व्यक्तिमत्त्व असलेले दिलीप छाब्रिया यांनी तयार केलेली डीसी अवंती स्पोर्ट्स कार प्रदर्शनात प्रथमच पाहण्यास मिळणार आहे. याशिवाय तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या हर्ले डेव्हिडसनच्या दुचाकीही उपलब्ध असतील. सकाळी दहा ते रात्री वाजेपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रदर्शनात सहभागी प्रतिष्ठाने
शिरीननिसान (निसान, डॅटसन), रत्नप्रभा मोटर्स (महिंद्रा), मोक्ष मोटार बाइक कंपनी (हर्ले डेव्हिडसन), हायकॉन सुझुकी (सुझुकी), पगारिया बजाज (बजाज), स्टेट बँक ऑफ इंडिया, रामतारा मोबिलिटी (व्हेस्पा), महेश टीव्हीएस (टीव्हीएस), रत्नप्रभा मोटर्स होंडा (होंडा मोटर्स), सेठी मोटर्स (महिंद्रा दुचाकी), सोहम ऑटो (यामाहा), शेल लुब्रिकंट्स (शेल ऑइल), ब्लोसम कार डिटेलिंग (ब्लोसम), राज ऑटो हीरो मोटार कॉर्पोरेशन (हीरो), व्होक्सवॅगन औरंगाबाद (व्होक्सवॅगन), रत्नप्रभा फोर्ड (फोर्ड), सोहम ह्यंुदाई (ह्युंदाई), गिरिजा मोटर्स (महिंद्रा फर्स्ट चॉइस), धूत मोटर्स (ह्युंदाई), डेक्कन होंडा (होंडा), शेवरोले, टाटा, डीसी मोटर्स (अवंती), मर्सिडीझ बेंझ बी. यू. भंडारी (मर्सिडीझ), पगारिया नेक्सा (नेक्सा).
बातम्या आणखी आहेत...