आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज बहुचर्चित पीकेचा आवाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा चित्रपट झळकणार असेल तेव्हा इतर कुणीही चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस करत नाही. आमिर अभिनीत प्रत्येक चित्रपटाची मुहूर्तापासूनच प्रचंड चर्चा असते. पीकेदेखील चर्चेत राहिला. विशेष म्हणजे चित्रपटाचा फर्स्ट लूकमुळे तर तो प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय ठरला. मात्र, हा चित्रपट कुटुंबासह पाहता येईल, असा असल्याचा दावा आमिरने केला आहे.
औरंगाबादेतील सर्वच चित्रपटगृहांमध्ये आज फक्त आणि फक्त पीकेच आहे. टेलिबुकिंग आणि इंटरनेट बुकिंग करत चाहत्यांनी आधीच आपली जागा आरक्षित केली आहे. यापूर्वी आलेल्या तलाश, धूम-३ च्या प्रदर्शनाप्रसंगीही हीच परिस्थिती होती. आमिर आपल्या प्रत्येक चित्रपटात हटके काही तरी करतो, मग विषय असो, स्टंट असो किंवा चित्रपटाचे प्रमोशन असो. टीव्ही, वृत्तपत्रे मीडियापेक्षाही त्याने स्वत: चाहत्यांमध्ये जाऊन चित्रपटाची क्रेझ वाढवली आहे. यापूर्वी राजकुमार हिराणी आणि आमिर ‘थ्री इडियट्स’मध्ये एकत्र आले होते आणि चित्रपटाने तुफान यश मिळवले होते. अनुष्का शर्माचीदेखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. शहरातील अनेक चित्रपटगृहांबाहेर आज तरुणांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठीही गर्दी केली होती.