आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरसाट-दानवे वादाची आज मुंबईत सुनावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पक्षात दादागिरी करणारे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची पदावरून नव्हे, तर थेट शिवसेनेतूनच हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय शिरसाट यांनी केल्यानंतर पक्षातील बंडाळी पुन्हा एकदा जगजाहीर झाली. त्यावर मंगळवारी (१३ सप्टेंबर) मुंबईत सेना भवनात सुनावणी घेण्यात येणार आहे. सेना नेते अनिल देसाई यांनी ही बैठक बोलावल्याचे समजते.

खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट आमदार संदिपान भुमरे, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख दानवे नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता ही बैठक होईल. यातील काही जण सायंकाळीच मुंबईकडे रवाना झाले, तर खासदार खैरे हे सकाळी विमानाने जाणार आहेत. दानवे हे सोमवारी इंदूर येथे होते. तेथून ते मुंबई गाठणार आहेत.
शिरसाट यांनी प्रथमच जाहीरपणे दानवे यांच्यावर आरोप करताना थेट पक्षातून हकालपट्टीची मागणी केली. त्यामुळे हे प्रकरण पक्षाने गांभीर्याने घेतल्याचे तूर्तास दिसून येते.

पक्षप्रमुख निर्णय घेणार
दानवे यांच्यावर शिरसाट यांनी आरोप केले तेव्हा माने, त्रिवेदी जैस्वाल ही मंडळीही हजर होती. मंगळवारच्या बैठकीत त्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. देसाई हे खैरे यांच्यापासून प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतील. त्यानंतर पक्षप्रमुखांकडे अहवाल दिला जाईल. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर कोणावर कारवाई करायची, कोणाचे खांदेपालट करायचे यावर निर्णय होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांच्या आगमनानंतरच काय तो निर्णय होऊ शकेल.
बातम्या आणखी आहेत...