आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज शहराला पाणी मिळणार, नवीन ट्रान्सफाॅर्मर बसवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जायकवाडीतील बिघडलेल्या ट्रान्सफाॅर्मरची दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे लक्षात येताच शुक्रवारी दुपारी हा ट्रान्सफाॅर्मरही बदलण्यात आला. रात्री दहा वाजेपर्यंत त्याची चाचणी घेऊन पाण्याचा उपसा सुरू झाला अाहे. शनिवारी दुपारनंतर शहराचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.
जायकवाडीत पाण्याचा उपसा करण्यासाठी पाच पंप आहेत. या पंपांना वीजपुरवठा करणारा एक ट्रान्सफाॅर्मर बुधवारी सकाळी (दि. २१) बिघडला होता. गुरुवारीही या ट्रान्सफाॅर्मरची दुरुस्ती पूर्ण झाली नाही. शुक्रवारी दुरुस्तीदरम्यान काॅइल गरम होत असल्यामुळे फारोळ्याच्या जलशुद्धीकरण केंद्रातील ३३ केव्ही क्षमतेचा ट्रान्सफाॅर्मर जायकवाडीला आणून बसवला. त्याची चाचणी घेतल्यानंतर रात्री दहापासून पाण्याचा उपसा पुन्हा सुरू झाला.

यामुळे उद्या शनिवारी दुपारनंतर शहराचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होण्याची शक्यता आहे, तर ज्या भागांना पाणी मिळाले नाही त्यांना उद्या पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे.

आज सकाळी ट्रान्सफाॅर्मरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीचे काम मोठे असल्याने त्यास वेळ लागला. आज सायंकाळपर्यंतही ते पूर्ण होऊ शकले नाही. उद्या हे काम पूर्ण होणार अाहे. त्यानंतर चाचणी घेऊन सायंकाळपर्यंत पाणी उपसा सुरू होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सध्या फक्त तीन पंपांवरूनच पाण्याचा उपसा सुरू आहे. मुख्य मोठ्या जलवाहिनीचा पुरवठा मात्र या बिघाडामुळे बंद आहे.
बातम्या आणखी आहेत...