आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज शहरातील १५० एटीएम सुरू राहणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील ७५० एटीएमपैकी शनिवारी १०० एटीएम सुरू राहिल्याने बँकांतील गर्दीला ४० टक्के आेहोटी लागली. उद्या रविवारी १५० एटीएम सुरू राहणार असल्याने नागरिकांची फरपट आणखी कमी होईल. मात्र, एका एटीएममध्ये केवळ लाख रोकड भरली जाणार असल्याने गरजेपुरतेच पैसे काढण्याचे आवाहन बँकांनी केले आहे.
शनिवारी एसबीआयचे ८० एटीएम सुरू राहिल्याने बँकांतील गर्दीला आपोआपच आळा बसला. तर एकाच ठिकाणी होणारी गर्दीही पांगली. मात्र, मोठ्या बँकांत सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी करून पैसे काढले, तर सामान्य नागरिकांनी जुन्या नोटा जमा केल्या. आरबीआयने शनिवारचा दिवस ज्येष्ठ नागरिकांसाठी राखून ठेवला होता. त्यामुळे केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नोटा बदलून दिल्या जात होत्या. शिवाय २४ हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम काढण्याची त्यांना मुभाही होती. सिडकोतील एसबीआय शहागंज येथील एसबीएच बँकेत मोठी गर्दी होती. सिडकेतील बँकेत शांततेत सर्व व्यवहार पार पडले. मात्र, शहागंजच्या हैदराबाद बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी होती. तेथे काही लोकांत वादावादी मारामारीची घटना घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण निवळले. एटीएमवरशिस्तीत रांगा : एसबीआयचे८० एटीएम सुरू झाल्याने एकाच ठिकाणी होणारी गर्दी विखुरली. त्यामुळे एटीएमवर तीस ते चाळीस लोकांचीच रांग होती. काही ठिकाणी तर अगदी दहा-पंधरा लोकच उभे दिसले.

हैदराबाद बँकेकडून २३ कोटी वितरण : एसबीएचच्याअधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही एसबीआयकडून २३ कोटी रुपये घेतले होते. आठ दिवसांत ही रक्कम ग्राहकांना वितरित करण्यात आली. यात तीन कोटी शंभरच्या, तर उर्वरित रक्कम दोन हजारांच्या नोटांच्या स्वरूपात होती.
दीडशे एटीएममध्ये साडेचार कोटी : रविवारी१५० एटीएम सुरू राहतील. यात एसबीआयचे १००, एसबीएचचे २०, महाबँकेचे १० इतर सर्व मिळून २० एटीएम सुरू राहतील. सर्व एटीएममध्ये साडेचार कोटी रक्कम टाकली जाई
एका एटीएममध्ये 3 फक्त लाख
नोटाबंदी आधी एटीएममध्ये ३० लाख रुपये भरले जायचे. बँकांकडेही नोटांचा तुटवडा असल्याने आता एका एटीएममध्ये लाख रुपये रक्कम भरली जात आहे. यातही शंभरच्याच नोटा राहतील.
बातम्या आणखी आहेत...