आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत वीज गुल; अाज शहरात पाणी नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जायकवाडीच्या पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा बंद झाल्याने गुरुवारी पाणीपुरवठा विस्कळीत हाेईल, अनेक भागांत पाणी येणार नाही. जायकवाडीच्या नवीन पंपिंग स्टेशनसाठी वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनमध्ये बिघाड झाला. सकाळपासून तेथून होणारा वीजपुरवठा बंद पडला. दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या बिघाडाचा परिणाम शहरासाठी होणाऱ्या पाण्याच्या उपशावर झाला आहे. जायकवाडी जलाशयातून औरंगाबादसाठी पाच पंपांद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. त्यातील तीन पंप काही तासांनंतर सुरू झाले असले तरी ते पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याचा परिणाम म्हणून औरंगाबादला होणारा पाणीपुरवठा प्रारंभी काही काळ बंद झाला. नंतर तीन पंपांच्या माध्यमातून अल्प प्रमाणात सुरू झाला. यामुळे शहराकडे येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. त्याचा परिणाम उद्याच्या (दि. २२) पाणीपुरवठ्यावर होणार आहे. उद्या शहराच्या ज्या भागांना पाणीपुरवठा होणार होता तेथे बहुतेक ठिकाणी कमी दाबाने, विलंबाने पाणीपुरवठा होईल, तर काही भागांत पाणीपुरवठा होणार नाही. या पुरवठ्याचे नियोजन करण्याचे काम मनपा प्रशासन औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटीच्या वतीने करण्यात येत होते.
बातम्या आणखी आहेत...