आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर आज अनोखी टिळा होळी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळाशी लढणाऱ्या लोकांविषयी संवेदनशीलता दाखवून पाण्याच्या बचतीची शपथ घेत ‘टिळा होळी’ खेळण्याचा अनोखा उपक्रम 'दिव्य मराठी'तर्फे आयोजित करण्यात आला आहे. देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता हा अागळावेगळा उपक्रम होणार आहे. त्यात अनेक मान्यवर शपथ घेणार असून शहरातील सर्व नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यावर गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाचे संकट कोसळत आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत यंदा गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. तेथे पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन 'दिव्य मराठी'ने टिळा होळी खेळण्यासाठी सर्व नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे ठरवले आहे. यामध्ये दुष्काळाच्या संकटाशी लढणाऱ्यांविषयी संवेदनशीलता दाखवत पाण्याची बचत करण्याची शपथ घेतली जाणार आहे. त्यात शहरातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठित सहभागी होणार आहेत. यासाठी शपथपत्रांद्वारे जनजागृती करण्यात आली. त्यास सर्व स्तरांतील नागरिक, मान्यवरांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. दुष्काळग्रस्तांबद्दल संवेदनशीलता आणि पाणी बचतीची शपथ घेणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी औरंगाबादकरांनी सकाळी १० ते ११ असा एक तास वेळ काढून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही मान्यवरांनी केले आहे.

प्रत्येक जण होऊ शकतो उपक्रमात सहभागी
सकाळीदहाला सुरू होणाऱ्या या उपक्रमात कोणत्याही वयोगटातील नागरिक, नोकरदार महिला, शिक्षक, विद्यार्थी, सरकारी-निमसरकारी, खासगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, कामगार, गृहिणी, नोकरदार, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, प्राध्यापक सहभागी होऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...