आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी पंपहाऊसची दुरुस्ती संपली, आज-उद्या पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जायकवाडी पंपहाऊस क्षेत्रात सकाळी नऊ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामामुळे वीज बंद असल्याने शुक्रवारी एक थेंबही शहरात पाणी आले नाही. मात्र सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरात जे पाणी आले, त्याचे वितरण सकाळी दहा वाजेपर्यंत करण्यात आले होते. मात्र शहरातील निम्म्यापेक्षा जास्त भागात निर्जळी असल्याने नागरिकांची परवड झाली होती. तसेच ज्यांना शुक्रवारी पाणी आले नाही, त्यांना शनिवारी पाणी मिळेल, असे पाणीपुरवठा अभियंता सरताजसिंग चहल यांनी सांगितले.
 
महावितरणने पैठण उपकेंद्रात दुरुस्तीसाठी शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपासून जायकवाडी पंपहाऊसची वीज बंद केली होती. त्यामुळे दिवसभर मनपाला पाणी उपसा करता आल्याने एक दिवस विलंबाने नागरिकांना पाणी मिळणार आहे.
 
या भागात उद्या
समर्थनगर, अदालतरोड, कोकणवाडी, क्रांतीनगर, पदमपुरा, भावसिंगपुरा, समतानगर, खोकडपुरा, अजबनगर, भाग्यनगर, पडेगाव या भागात परवा पाणी येण्याची शक्यता आहे.
 
या भागात आज
एन १, मथुरानगर, साईनगर, एन ७, एन ९, पवननगर, आंबेडकरनगर, एन एच सेक्टर, एन १२, छत्रपतीनगर, सुरेवाडी, नारेगाव, मयूरपार्कचा काही भाग, एकनाथनगर, पीरबाजार, पैठणगेट
 
बातम्या आणखी आहेत...