आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठ अभिसभा व विद्या परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरु; काही ठिकाणी गोँधळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभिसभा व विद्या परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. अधिसभेच्या चार गटांसाठी, तर विद्या परिषदेच्या (अकॅडमिक कौन्सिल) चार गटांसाठी मतदान होत आहे. दोन गणासाठी मतदान केल्यामुळे काही ठिकाणी गोंधळ झाला आहे. मतदारांना विद्यापीठाने एसएमएस पाठवले नसल्याच्याही तक्रारी आहेत. अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या १० जागांपैकी तिघे जण बिनविरोध निवडून आले आहेत. 


अधिसभेच्या चार गटांसाठी, तर विद्या परिषदेच्या (अकॅडमिक कौन्सिल) चार गटांसाठी मतदान होईल. त्यासाठी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांसाठी 20 मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत मतदान होणार आहे. अधिसभेच्या प्राचार्य गटाच्या 10 जागांपैकी तिघे जण बिनविरोध निवडून आले आहेत. 


उर्वरित जागांसाठी 15 उमेदवार निवडणूक रिंगणात अाहेत. संस्थाचालक गटाच्या जागांपैकी दोन जण बिनविरोध निवडून आले आहेत. अाता एका जागेसाठी जण, तर विद्यापीठ शिक्षक गटाच्या जागांसाठी जण निवडणूक लढवत आहेत. महाविद्यालयीन शिक्षकांच्या 10 जागांसाठी 30 उमेदवार, विद्या परिषदेच्या जागा असून वाणिज्य आणि व्यवस्थापन गटाच्या जागांसाठी उमेदवार उभे आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान गटाची जागा बिनविरोध निघाली. आता एका जागेसाठी जण, सामाजिक शास्त्र गटाच्या जागांसाठी जण, तर आंतरविद्या शाखेच्या जागांसाठी जण निवडणूक लढवत आहेत. मतदारांना एसएमएसद्वारे मतदान केंद्र कळवले जाणार आहे, असे कुलसविच डॉ. साधना पांडे म्हणाल्या. 


मतदारांची संख्या अशी 
चारगटांत होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविद्यालयीन शिक्षक गटातून ३४३४, विद्यापीठ शिक्षक गटातून १७२, व्यवस्थापन गटातून १७८ आणि प्राचार्य गटातून १०४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...