आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरनारींसह वीरपुत्रांचा सम्मान, मध्यम तोफखाना रेजिमेंटच्या माजी सैनिकांचे संमेलन थाटात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छावणीतील६९ मेडियम रेजिमेंटच्या वतीने माजी सैनिकांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रेजिमेंटच्या स्थापनेप्रसंगी जवान म्हणून सामील झालेल्या अनेक निवृत्त सैनिकांची याप्रसंगी उपस्थिती होती. त्यांनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. रेजिमेंटच्या शहीद जवानांच्या वीरपत्नी वीरपुत्रांचा गौरव कर्नल विवेक भटारा यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

जालंधर (पंजाब) येथे ६९ रेजिमेंटची स्थापना फेब्रुवारी १९६३ ला करण्यात आली. ले. कर्नल पीकेएस चांद पहिले कमांडिंग अधिकारी होते. पूर्वीची फील्ड रेजिमेंट एप्रिल २०१० पासून मेडियम रेजिमेंट म्हणून ओळखली जाऊ लागली. रेजिमेंट मागील चार वर्षांपासून औरंगाबाद येथे आहे. रेजिमेंटने १९६५ मध्ये ऑपरेशन अॅबलाझ रिडल, नाथुला ऑपरेशन (१९६७), ऑपरेशन कॅक्टस लिली (१९७१), ऑपरेशन ब्ल्यू स्टार (१९८४), ऑपरेशन ट्रायडंट (१९८७), ऑपरेशन फाल्कन (१९८७-१९९०), ऑपरेशन रक्षक विजय (१९९९), ऑपरेशन पराक्रम (२००१)आदींमध्ये सहभाग नोंदवला.
गौरवपूर्ण ५२ वर्षे पूर्ण केल्याबद्दल १५ ते १९ जुलै २०१५ दरम्यान माजी सैनिकांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने निवृत्त सैनिक, वीरपत्नी, वीरपिता, वीरपुत्र आदींनी उपस्थिती नोंदवली. रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल विवेक भटारा यांनी सर्वांचे स्वागत केले.

तीनयुद्ध लढलेले मुकणे
रेजिमेंटच्यास्थापनेप्रसंगी जालंधर येथे जवान म्हणून सहभागी झालेले अंबादास गणपत मुकणे (७०, रा. देवळाली कॅम्प नाशिक) कार्यक्रमाला उपस्थित होते. मुकणे यांनी भारत-पाकिस्तान युद्ध (१९६५), छागोझिल (सिक्कीम) चायना अॅक्शन १९६७ बांगलादेश वॉर १९७१ मध्ये २४ परगणा येथे सहभाग घेतला. १९६३ मध्ये रेजिमेंटमध्ये दाखल मुकणे यांनी फेब्रुवारी १९८० रोजी निवृत्ती घेतली. १७ मे १९६९ रोजी धनबादहून पनागडला जाताना आसनसोल येथे रेल्वे अपघातामध्ये ९० टक्के भाजल्यानंतरही दोन महिन्यांत ठणठणीत बरे होऊन ड्यूटी केल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.
वीरनारींचा ६९ मेडियम रेजिमेंटतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुभेदार अनंत जाधव, वीरपुत्र रमेश लोहार, अश्विनी जाधव, अश्विनी थरवाल, वैशाली कोरपे, कल्पना शिंदे, पार्वताबाई लहाने, राजश्री मुरकुटे, कर्नल विवेक भटारा आदी दिसत आहेत.

वीरनारींसह पुत्रांचा सन्मान
रेजिमेंटमधीलशहीद जवानांच्या पत्नी, माता-पिता अथवा पुत्रांचा सन्मान केला जातो. याप्रसंगी वीरपुत्र रमेश लोहार, अश्विनी जाधव, अश्विनी थरवाल, वैशाली करपे, कल्पना शिंदे, पार्वताबाई लहाने, राजश्री मुरकुटे आदींचा सन्मान करण्यात आला.

असेहोते फायर
- अतिवेगवानफायर : मिनिटांतगोळे
- वेगवानफायर : एकामिनिटात दोन गोळे
- नॉर्मल फायर: एकामिनिटात एक गोळा
- धिमे फायर: तीनमिनिटांत दोन गोळे
- खूप धिमा: तीनमिनिटांत एक गोळा

तोफखाना कवायत
याप्रसंगीरेजिमेंटच्या तोफखान्याची कवायत दाखवण्यात आली. ही तोफ चालवण्यासाठी गनर असतात. ४५ अंश कोनातून तोफ डागली जाते. गोळ्याचे वजन ३५ किलो तर तोफेचे वजन ८४५० किलो आहे. मारक क्षमता २७४९० मीटर (२७.४९० कि. मी.) इतकी आहे. गोळ्याचा ३०० मीटर परिघात परिणाम होतो. ओपनिंग रेज म्हणजेच कमीत कमी १४०० मीटर (१.४ कि. मी) इतक्या अंतरापासून मारक क्षमता सुरू होते. यापेक्षा कमी अंतरावर या तोफेचा मारा करता येत नाही.
औरंगाबादेतील ६९ मध्यम तोफखाना रेजिमेन्टच्या वतीने आजी माजी सैनिक तथा त्यांच्या कुटुंबीयासाठी तोफांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...