आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toilet Problemes Issue At Aurangabad News In Marathi

सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था;दरवाजे मोडकळीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक ५७ भवानीनगरअंतर्गत येणाऱ्या तक्षशीलनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झालेली आहे. येथील १२ शौचालयाला जोडण्यात आलेले शासकीय नळ बंद िस्थतीत असून दरवाजेही मोडकळीस आले आहेत. त्यामुळे १०० कुटुंबीयांची गैरसोय होत आहे.
तक्षशीलनगर येथील सार्वजनिक शौचालयात पाणी नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काहींना दरवाजेच नाही, तर काही ठिकाणी दरवाजे मोडकळीस आले आहेत. शौचालयातील नळ बंद असल्याने नागरिकांना घरूनच बकेटमध्ये पाणी न्यावे लागते. एवढेच नव्हे तर शौचालयाच्या बाजूला बांधण्यात आलेला हौदही कोरडा पडलेला आहे. पुरुष आणि महिलांसाठी १२ शौचालये असून त्यापैकी काही शौचालयांचे भांडे फुटलेले आहेत. आठवड्यातून सफाई करणारे कर्मचारी व्यवस्थित सफाई करत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही काम झालेले नाही. नगरसेवकही उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठेकेदार काम करायला तयार नाहीत
शौचालयाची भिंत मोडकळीस आलेली होती. ती बांधण्यात आली. परंतु ठेकेदाराची बिले निघालेली नाहीत. या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यासाठी सहा महिन्यांपासून सांगण्यात आलेले आहे. ठेकेदार काम करायला तयार नाहीत. परंतु लवकर काम व्हावे, यासाठी पाठपुरावा केला जाईल.
रेणुका वाडेकर, नगरसेवक
सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती तत्काळ करा
सार्वजनिक शौचालयासाठी नळ जोडण्यात आला होता. परंतु तोही बंद झाल्याने स्वच्छतागृहात पाणी नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.
संजय कोकणे, रहिवासी
पाणी नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. लहान मुले आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा निवेदन देऊनही या स्वच्छतागृहाकडे कोणी लक्ष देत नाही. दरवाजे मोडकळीस आल्याने महिलांची गैरसोय होत आहे.
कडूबाई गायकवाड, रहिवासी
दिव्य मराठी हेल्पलाइन
तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमच्या प्रतिनिधींना ९७६५०७०३३३, ९०२८०४५१९९ या मोबाइल क्रमांकांवर समस्या कळवा.