आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाचे कारण पुढे करून टोलवसुली शहरालगत टोल; सेवा मात्र शून्य!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रस्ते एकात्मिक विकास योजनेअंतर्गत शहर विकासासाठी शहरालगतच्या रस्त्यांवर तीन टोलनाके उभारून वाहनधारकांचा खिसा रिकामा केला जात आहे. मात्र या टोलवसुलीतील एक छदामही शहराच्या विकासावर खर्च होता तो रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) तिजोरीत जमा होत आहे. ज्या रस्त्यांवर टोल वसूल केला जात आहे, त्यांची अवस्था तर शहरातील रस्त्यांपेक्षाही वाईट आहे. असे असतानाही महामंडळाकडून तात्पुरती मुदतवाढ देऊन टोलच्या नावाखाली वाहनधारकांकडून रक्कम वसूल केली जात आहे.
विकासाच्या गप्पा मारून निवडून आलेल्या आमदार-खासदारांनी २००१ मध्ये एकात्मिक विकास योजनेअंतर्गत १६७ कोटी ८० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. त्यासाठी मनपाकडून ४.५ कोटी, नगरविकास विभागाकडून प्रतिवर्ष कोटींप्रमाणे एकूण ६० कोटी, वैधानिक विकास मंडळाकडून कोटी प्रतिवर्षाप्रमाणे चार वर्षांसाठी १२ कोटी, विधानसभा विधान परिषद सदस्य प्रतिवर्ष २० लाखांप्रमाणे तीन वर्षांसाठी कोटी २० लाख, लोकसभा सदस्य ५० लाख प्रतिवर्षाप्रमाणे तीन वर्षांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी देणे गरजेचे होते. मात्र, या कामांचे श्रेय मिळणार नसल्याने सर्वांनीच हात वर केले. परिणामी योजनेअंतर्गत मंजूर झालेली बहुतांश कामे आजपर्यंत पूर्ण होऊ शकली नाहीत. शहराची दुरवस्था असण्यामागे हेच कारण आहे.

- टोलवसुली नियमाप्रमाणेच आहे. कंत्राटदारांची मुदत संपल्याने त्यांनी ऑनलाइन पावत्या देणे बंद केलेले असावे. आम्ही लक्ष ठेवून आहोत. राजकारण्यांनी सहकार्य केल्यानेच आज ही दुरवस्था आहे. मार्चनंतर नवीन निविदा निघेल. मग सर्व सुरळीत होईल. तृप्तीनाग, कार्यकारीअभियंता, एमएसआरडीसी
- रस्ते चांगले नसतानाही शहरालगतच्या टोलवर वसुली होते. आम्ही या प्रकरणी न्यायालयात जाणार असून एक तर रस्ते चांगले करून टोल घ्या, अन्यथा हे टोलनाके बंद करा. विशालपरदेशी, एन-९,पवननगर, सिडको
मध्ये दिली कामांना मंजुरी
शहरालगत पैठण रोडवर नक्षत्रवाडी, जळगाव रोडवरील सावंगी, लासूर-शिर्डी रोड असे तीन टोलनाके तुंबडी भरत आहेत. या तिन्ही नाक्यांवर टोलवसुली केली जात असली तरी वाहनधारकांना काहीच सेवा मिळत नाही. गुळगुळीत रस्त्यांवर प्रवास केल्यास टोल भरण्यास कोणाचीही हरकत नाही. शहरापेक्षाही मोठे खड्डे या मार्गावर आहेत. सावंगी टोलनाक्याच्या वसुलीची २५ लाख रुपये प्रतिमाहप्रमाणे तीनदा निविदा काढण्यात आली. मात्र कंत्राटदाराने प्रतिसाद दिल्याने जुन्याच कंत्राटदारास मुदतवाढ देण्यात आली.