आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन एकरांतील टोमॅटोपासून मिळेल 16 लाखांपर्यंत उत्पन्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घाटनांद्रा- दोन एकरांत लागवड केलेल्या टोमॅटोपासून भाव स्थिर राहिल्यास १५ ते १६ लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज चारनेर येथील शेतकरी लतीफमियाँ देशमुख यांनी व्यक्त केला आहे.यू. एस. कंपनीच्या ४४० वाणाच्या गावरान टोमॅटोची लागवड देशमुख यांनी केली आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून टोमॅटोला भाव नसल्याने आणि उत्पादन जास्त झाल्याने शेतकऱ्यांना ते अक्षरशः रस्त्यावर फेकून द्यावे लागले होते.  

या वर्षी या हंगामात निवडक  शेतकऱ्यांनी  केवळ २० ते २५ टक्केच टोमॅटोची लागवड केली आहे. सध्या  बाजारात ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटोची  विक्री होत आहे.  यंदा टोमॅटोची लागवड कमी झाल्यामुळे बाजारपेठेत  चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल चांगला भाव मिळत आहे. एका तोडणीला ७० ते ७५ क्विंटल टोमॅटोचे उत्पन्न होत आहे. सरासरी ६ ते ७ तोडण्यापर्यंत  १५ ते १६ लाख रुपयांचे उत्पन्न निघणार आहे. लागवडीपासून आतापर्यंत त्यांना यासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च झाला असल्याचे  देशमुख यांनी सांगितले.  टोमॅटो हे  नाजूक पीक असून या पिकावर करपा, काळा ठिपका, व्हायरस, नागअळी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त  प्रमाणात   होतो, असेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...