आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा माेर्चामुळे बहुतांश शाळा, महाविद्यालयांना शनिवारी सुटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काेपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ येत्या शनिवारी (दि. २४) सकाळी १० वाजता तपाेवनापासून निघणाऱ्या मराठा क्रांती माेर्चामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पाेहोचण्यास अडचणी उद््भवू शकतात. या दृष्टीने शहरातील बहुसंख्य शिक्षण संस्थांनी शनिवारी शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली अाहे. काही शाळांनी नियमित वेळ बदलून अर्धा दिवस शाळा सुरू ठेवण्याचाही निर्णय घेतला अाहे.
मराठाविद्या प्रसारक - संस्थेच्यासर्व प्राथमिक, माध्यमिक, अाश्रमशाळा, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात अाल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी दिली.
महात्मागांधी विद्यामंदिर- महात्मागांधी विद्यामंदिर अाणि अादिवासी सेवा समितीच्या मिळून जिल्ह्यात २०० शाळा, वसतिगृह, महाविद्यालये अाहेत. माेर्चात विद्यार्थी, प्राध्यापक अाणि शिक्षकांना सहभागी हाेता यावे म्हणून संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुटीची मागणी केली अाहे. ही सुटी त्यांनी जाहीर केल्यास संस्थेतील शाळा, महाविद्यालयांना २४ राेजी सुटी देण्यात येईल, असे संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रशांत हिरे यांनी सांगितले.
गाेदावरी शिक्षण मंडळ - मंडळाचीजिल्ह्यात शाळा अाणि महाविद्यालये अाहेत. यात जी. डी. सावंत महाविद्यालयाचाही समावेश अाहे. या शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात अाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अशाेक सावंत यांनी दिली.
सपकाळ नाॅलेज सिटी- यासंस्थेच्या महाविद्यालयात हजार ७८५ विद्यार्थी अाहेत. या महाविद्यालयांना दुसऱ्या अाणि चाैथ्या शनिवारी सुटी असतेच. पण, यात बहुसंख्य वर्गांच्या जादा तासिका असतात. या तासिकांनाही सुटी देण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ यांनी सांगितले.
ग्रामाेदय शिक्षण- संस्थेचेजिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालये १५ माध्यमिक शाळा अाहेत. या शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात अाल्याची माहिती संस्थेचे ट्रस्टी महेश हिरे यांनी दिली.
नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक - संस्थेच्याब्रह्मा व्हॅली काॅलेजला शनिवारी सुटी असतेच. परंतु विद्यार्थी, शिक्षकांच्या मागणीवरून संस्थेच्या १५ शाळांनाही सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी दिली.
एनअायटी अण्णासाहेब पाटील शिक्षण संस्था- संस्थेचेशहरात डीएड, नर्सिंग पाॅलिटेक्निक महाविद्यालय असून, त्यांना सुटी जाहीर करण्यात अाली अाहे, असे संस्थेचे अध्यक्ष सुरेशअण्णा पाटील यांनी सांगितले.
धन्वंतरी महाविद्यालय- धन्वंतरीडिझायनिंग अॅण्ड टेक्नाॅलाॅजी तसेच धन्वंतरी हाेमिअाेपॅथी महाविद्यालयाला माेर्चाच्या दिवशी सुटी देण्यात अाली असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा सराेज धुमणे यांनी सांगितले.
नाशिक एज्युकेशन साेसायटी- साेसायटीच्याशहरातील शाळांच्या वेळा बदलण्यात अाल्या अाहेत. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मंगळवारी (दि. २०) हाेणाऱ्या बैठकीत घेण्यात येईल, असे संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...