आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण शहरात उद्या निर्जळी; एक दिवस पुढे ढकलला पाणीपुरवठा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जायकवाडी येथील पंपगृहात पाणीपुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही उपकेंद्रात आवश्यक कामासाठी मनपाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेतले आहे. १४ जुलै २०१७ रोजी शुक्रवारी सकाळी नऊ ते रात्री वाजेपर्यंत पूर्णपणे पाणी उपसा बंद राहणार आहे. परिणामी शहरात येणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दिवसभर शहरात निर्जळी राहणार आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजता जायकवाडीत पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे.

शहरात हे पाणी येण्यासाठी सहा तासांपेक्षा जास्त अवधी लागणार असल्याने रात्री उशिरा शहरात पाणी येण्यास प्रारंभ होईल. त्यानंतर शहरातील जलकुंभ भरण्यासही विलंब लागणार असल्याने शनिवारी उशिराने शहरवासीयांना काही प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येईल. त्याचबरोबर ज्यांना शुक्रवारी पाणी देण्यात येणार आहे, त्यांना शनिवारी आणि ज्यांना शनिवारी पाणी मिळणार होते, त्यांना रविवारी असे एक दिवस विलंबाने नागरिकांना पाणी मिळणार असल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...