आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Developments Till 5 Pm Today From Divya Marathi

QUICK RECAP: दिवसभरातील महत्त्वपूर्ण 9 घडामोडी (Till 6.30 PM Today)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IND vs AUS : भारताने T 20 मालिका जिंकली, दुसऱ्या सामन्यात 27 धावांनी विजय
मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या T 20 सामन्यात पराभव करत भारताने तीन सामन्यांची मालिका जिंकली आहे. 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीच्या तडाखेबाज फलंदाजीनंतर कांगारुंचा संघ पुन्हा पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला. भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत भारताला 27 धावांनी विजय मिळवून दिला.
सानिया-हिंगिसचा सलग 36 वा विजय, जिंकला ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब
मेलबर्न- भारतीय टेनिसपटूसानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिसने ऑस्ट्रेलियन ओपनचा महिला दुहेरीचा किताब पटकावला. या जोडीने झेक गणराज्याच्या आन्द्रिया लावाकोवा आणि लूसी रादेकाचा पराभव केला. यंदा दोघींनी ब्रिस्बेन इंटरनॅशनल ओपनही जिंकले आहे. हा सानिया-हिंगिसची सलग 36 वा विजय आहे.
VIDEO: जुहू किनाऱ्यावर आढळला 30-35 फुटांचा मृत मासा, वजन तब्‍बल 20 टन
जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर ब्रुडीज व्हेल जातीचा मासा मृतावस्थेत आढळला. हा मासा सुमारे 30 ते 35 फूट लांबीचा असून त्याचे वजन तब्बल 20 टन आहे. समुद्राला भरती असल्याने किनाऱ्यावर येत असलेला हा मासा वाळूत रुतून बसला. या माशाच्‍या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्‍या आहेत. त्‍याचा मृत्‍यू कसा झाला याचा तपास घेण्‍यात येत आहे.
मुंबई पोलिस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर, उद्या स्वीकारणार पदभार
मुंबई- मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी ज्येष्ठ पोलिस अधिकारी दत्ता पडसलगीकर यांची वर्णी लागली असून, उद्या (शनिवारी) ते विद्यमान आयुक्त जावेद अहमद यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. जावेद अहमद उद्या सेवानिवृत्त होत आहेत.
अमेरिकेत Zika Virus चे थैमान; 40 लाख अमेरिकन नागरिकांना धोका
जिनिव्हा- आफ्रिका आणि आशियामध्ये आढळणारा झिका व्हायरस आता दक्षिण अमेरिकेपाठोपाठ उत्तर अमेरिकेत पसरला आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत असल्याने सुमारे 40 लाख अमेरिकन नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायझेशनने (WHO) हायअलर्ट घोषित केला असून याबाबत एक फेब्रुवारीला आपातकालीन बैठक बोलावली आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
ई-तिकिटांचा काळा बाजार बंद होणार, एका युजरला बुक करता येतील फक्त सहा तिकीटे
नवी दिल्ली- आयआरसीटीसी ई-तिकिटांमधील काळा बाजार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने नवी उपाययोजना शोधून काढली आहे. ती म्हणजे, आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता एका यूजर आयडीवरून महिन्याभरात केवळ सहा तिकिटे बुक करता येणार आहे.
झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ला: पेरु-लिंबू खाणे सात पोलिसांच्या जीवावर बेतले
रांची/पलामू- झारखंडमध्ये पलामू बुधवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात पोलिसांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पेरु-लिंबू खाणे पोलिसांच्या जीवावर बेतल्याची माहिती समोर आली आहे.
Movie Review :गुंतवून टाकणारे 'बंध नायलॉनचे'
http://divyamarathi.bhaskar.com/news-hf/BOL-REV-REV-movie-review-bandh-nylonche-5235167-NOR.html
Movie Review: माधवन-रितिकाच्या उत्कृष्ट अभिनयासाठी पाहावा 'साला खड़ूस'
http://divyamarathi.bhaskar.com/news-hf/BOL-REV-REV-saala-khadoos-movie-review-5235155-PHO.html
VIDEO+PIX : रिलीज झाला राधिका आपटेच्या नव्या सिनेमाचा दमदार ट्रेलर!
http://divyamarathi.bhaskar.com/news-hf/BOL-BNE-radhika-apte-starer-parched-trailor-release-5235026-PHO.html