आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पण कासव गेले कुणीकडे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिस आणि वनविभागाच्या संयुक्त कारवाईने ५ नोव्हेंबर रोजी कासव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर आणखी तीन दिवसांनी त्रिमूर्ती चौकातील घरात कासव आढळले. मात्र, गुन्हा नोंदवून वनविभागाकडे वर्ग करण्याऐवजी जवाहरनगर आणि उस्मानपुरा पोलिसांमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. कासव होते, पण आपण कारवाई केली नसल्याचे दोन्ही ठाण्यांनी दावे केले. यामुळे हद्दीच्या वादात नेमके कासव गेले कुणीकडे असे म्हणण्याची वेळ आली आहे...!
मागील आठवड्यात वनविभाग आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कासव तस्करी उजेडात आणली. आरोपींना पोलिस कोठडीत डांबल्यामुळे घरातील हौदात कासव ठेवणारे रुपेश बाळकृष्ण बोराडे (रा. ित्रमूर्ती चौक, जवाहर कॉलनी) यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उस्मानपुरा पोलिसांना याविषयी माहिती मिळाल्यावर त्यांनी ७, ८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घराची झडती घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही दिवस घराला कुलूप असल्यामुळे ९ नोव्हेंबर रोजी झडती घेतली. त्यावेळी कासव घरी नव्हते, मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने ते पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासंदर्भात उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भारत काकडे यांना विचारले असता आपण रजेवर असून ही कारवाई जवाहरनगर पोलिसांनी केल्याचे सांगिततले, तर जवाहरनगर पोलिसांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्याने कारवाई केल्याची माहिती दिली.