आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन संचालनालयाचे कार्यालय औरंगाबादेत होणार : मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्याचे पर्यटन दृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकार पुरेसा निधी आणि योग्य नियोजनातून प्रयत्न करत आहे. पुढील काळात राज्याच्या पर्यटन संचालनालयाचे कार्यालय औरंगाबाद शहरात सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. औरंगाबादला पर्यटन राजधानीचा दर्जा देण्याचे अप्रत्यक्ष संकेतच त्यांनी यातून दिले.
या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अमृता फडणवीस, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, पर्यटन सचिव वल्सा नायर सिंग, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार अतुल सावे, सुभाष झांबड, प्रशांत बंब, महानंद व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे यांची उपस्थिती होती. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याप्रसंगी कॉफी टेबल बुक ‘गोल्डन बुक ऑफ महाराष्ट्र’, ‘एक्सप्लोअर एलोरा’ आणि ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, औरंगाबादेत २०० कोटी रुपये खर्च करून विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारीपासून या कामाला सुरुवात होईल. याशिवाय दौलताबाद, म्हैसमाळ आणि शूलिभंजन या पर्यटनस्थळांचा विकासही लवकरच हाती घेण्यात येईल. मागील वर्षी चीनच्या मंगोलिया बॉर्डरजवळील ड्युनहाँग येथे आम्ही भेट दिली. या अतिशय सौंदर्यपूर्ण लेणी होत्या. त्या वेळी माहिती देण्यात आली की, अजिंठा लेणीच्या या रिप्लिका आहेत. या लेणींचे मार्केटिंग व्यवस्थितरीत्या केल्यामुळे जगभरातून पर्यटक येतात, त्यामुळे व्हीजिट महाराष्ट्रमध्ये औरंगाबादला जगापुढे आणण्याचा मानस आहे.

वेरूळ महोत्सवाचे उद््घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. डावीकडून आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, मंत्री जयकुमार रावल, विधानसभा अभ्यक्ष हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, सुभाष झांबड.

दिल्ली, आगऱ्याच्या तुलनेचे पर्यटनस्थळ -रावल
औरंगाबादला पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व युनेस्कोने अधोरेखित केले आहे. दिल्ली आणि आगऱ्याच्या तुलनेत औरंगाबाद कमी नाही. त्यामुळे राज्याच्या पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता महत्त्वपूर्ण शहर आहे. त्यामुळे या दोन्ही शहराच्या दर्जाप्रमाणेच औरंगाबादच्या ऐतिहासिक वारशांचा विकास आणि संवर्धन येत्या काळात केले जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...