आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन: अजिंठा लेणी हाऊसफुल्ल, बसचा दहा लाखांचा बिझनेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा- दिवाळीच्या सुट्यांमुळे अजिंठा लेणी पर्यटकांनी बहरली असून चार दिवसांत प्रदूषणविरहित दहा बसेसना जवळपास दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आज, रविवारच्या सुटीमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.

अजिंठा लेणी पाहायला दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक येतात. मात्र, खरा पर्यटकांचा हंगाम सुरू होतो तो दिवाळीला. या दिवाळीलाही गर्दीचा विक्रम झाला. चार दिवसांत हजारो पर्यटकांनी दिलेल्या भेटीमुळे लाखो रुपयांचे उत्पन्न मानवी शुल्क, एसटी महामंडळ आदींना मिळाले आहे. व्यवसायही चांगले चालले आहेत. दिवाळीच्या दिवशी तर एवढी गर्दी होती की पार्किंगची जागा कमी पडली. त्यामुळे काही वाहनांना महामार्गावर पार्क करण्यात आले होते. गर्दीमुळे सोयगावचे पीआय संतोष घाटेकर हे पर्यटक रांगेवर लक्ष ठेवून होते.गाइड नसूनही पर्यटक लेणी पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

एटीएमचे पैसे संपले
देशी-विदेशीपर्यटकांची गर्दी वाढली आहे. अजिंठा गावात दोन फर्दापूर येथे एक एटीएम आहे. या एटीएमवर पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यामुळे या एटीएमवर पैशाचा ठणठणाट आहे. अनेक पर्यटकांना गैरसोयीचे झाले.

>लेणीत पाच एसी, पाच नॉन एसी अशा दहा बसेसच्या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे. चार दिवसांत सरासरी दोन ते अडीच लाखांचा व्यवसाय या बसच्या माध्यमातून झाला आहे.
-एस.साठे, आगारप्रमुख,सोयगाव

रात्री आठ वाजेपर्यंत रांग
सायंकाळीसाडेपाच वाजता लेणी बंद होते. असे असताना गर्दीमुळे रात्री आठ वाजेपर्यंत पर्यटकांच्या बसेसने परत जाण्यासाठी रांगा होत्या. गैरसोय टाळण्यासाठी सोयगाव आगाराने बसेसच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. तसेच रात्री दहा वाजेपर्यंत टी पॉइंटवरील शॉपिंग प्लाझा सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...