आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीही पर्यटकांना बीबी का मकबरा पाहण्याची मिळेल संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ताजमहालची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा रात्रीही पर्यटकांना पाहता यावा यासाठी तेथे रोषणाई करण्याचा विचार प्रशासनाने केला आहे. त्याबाबत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी परवानगी घेण्यासाठी प्राथमिक चर्चादेखील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मकबरा पाहण्यासाठी देशविदेशातून हजारो पर्यटक येतात. मात्र तेथे सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. वेरूळ लेणी पाहून झाल्यानंतर पर्यटक पाणचक्की बीबी का मकबरा येथे भेट देतात. मात्र सायंकाळी सहानंतर मकबऱ्यात अंधार राहत असल्याने भेट देता येत नाही.

जिल्हा नियोजनातून निधी
मकबऱ्यातविद्युत सुविधा नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. त्यामुळे जिल्‍हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याबाबत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या विषयी चर्चा केली. रात्रीलाही मकबऱ्याचे सौंदर्य न्याहाळता यावेे, तो आधिक आकर्षक दिसावा यासाठी विद्युत रोषणाई करण्याचा विचार त्यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून दाखवला. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी तसा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवतील. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास मकबरा रोषणाईने उजळून निघेल.