आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीच्या पावसाने गौताळ्यात बहार; बिबटे, अस्वल पाहण्याच्या उत्सुकतेने वनपर्यटन १० पटींनी वाढले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जोरदार पावसामुळे गौताळ्यातील जंगलाने हिरवी शाल पांघरली असून ४० पेक्षा जास्त धबधबे ओसांडून वाहत आहेत. या जंगलाचे सर्वात मोठे आकर्षण असणारी सिताखोरी वनश्री अाणि झऱ्यांनी समृध्द झाली आहे. या जंगलात १४ बिबटे वास्तव्यास असून सप्टेंबर महिन्यात या जंगलात प्रथमच अधिकाऱ्यांनी अस्वल पहिल्याने या जंगलास पूर्णत्व प्राप्त झाल्याचे वनअधिकारी सांगतात. हिरवाई, खळखळणारे धबधबे, अस्वल पाहण्याच्या उत्सुकतेने पर्यटकांत दहा पटींनी वाढ झाली आहे.

 २१०० चौकिमीपर्यंत पसरलेले हे जंगल मराठवाड्यात सर्वात मोठे आहे. बदलत्या वातावरणामुळे गत १५ वर्षात या जंगलातील प्राण्यांच्या प्रजननाचे प्रमाण घटले होते. २०१६ आणि २०१७ मध्ये गौताळ्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे वनपर्यटनाला चालना मिळाली. जूनप्रमाणेच सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येही जोरदार पाऊस झाल्याने जंगलातील सर्व नाले, तळी, ओढे भरून वाहू लागले. त्यानंतर सिताखोरी ही सर्वात खोल दरी पाहण्यासाठी गर्दी होत आहे. दिव्य मराठीने मेपासून येथील वनपर्यटन आणि जंगलातील एकूण स्थितीचा तेथे जाऊन सतत आढावा घेतला. विभागीय वनअधिकारी कमलाकर धामगे,सहायक वनसंरक्षक पी.व्ही जगत, वनपरिक्षेत्र अधिकारी बाळासाहेब जराड, सहायक वन्यजीव रक्षक आर.ए. नागापूरकर यांनी अनेक बंधारे बांधून जंगलात पाणी उपलब्ध करून दिले. त्यानंतर जून महिन्यात पावसाने वनजीवन बहरले. परतीच्या पावसाने जंगल घनदाट झाल्याने पर्यटकांच्या संख्येत दहा पटींनी वाढ झाली. मे महिन्यात फक्त ५० असणारी पर्यटकांची संख्या सप्टेंबरमध्ये हजारपर्यंत वाढली. 
 
प्रवेश शुल्कातून विक्रमी उत्पन्न : कन्नड नागद परिसरातून ये-जा करणारे, जंगल परिसरातील यात्रा सोडून फक्त पर्यटकांची संख्या मोजली जाते. यंदा जून १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश शुल्कातून अडीच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. ऑगस्ट महिन्यात १० वर्षात प्रथमच लाख रुपये एवढे विक्रमी प्रवेश मिळाले. 
 
अस्वलाची अधिकृत नोंद झाली 
याजंगलात १४ बिबटे, शेकडो कोल्हे ,लांडगे,नलगायी,सांबर आहेत. मात्र, नागरिक सांगत असले तरी अस्वलाचा वावर असण्यावर वन्यजीव अधिकाऱ्यांना विश्वास बसत नव्हता. पण वन्यजीव अधिकारी जराड नागापूरकर यांना सप्टेंबर महिन्यात एका रात्री अस्वल दिसले. त्यांच्या म्हणण्यानुसार आता खऱ्या अर्थाना गौताळा जंगल परिपूर्ण झाले. नागापूरकर म्हणाले, पावसामुळे जंगलात गरुडांची संख्याही तिप्पटीने वाढली आहे. तीन वर्षापूर्वी तीन घरटी होती आता गरुडांची पंधरा घरटी दिसली. 
बातम्या आणखी आहेत...