आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रोमॅंटिक पावसात नटली जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, पांढरेशुभ्र धबधबे झाले प्रवाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या 72 तासात मुसळधार पावसाने संपूर्ण औरंगाबादला धूवून टाकले आहे. नेहमीचा दुष्काळी भाग म्हणून ओळखलेल्या मराठवाड्यात बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच एवढा पाऊस पाहायला मिळाला. म्हणूनच की काय काल रविवार असतानासुध्दा अनेक निसर्गप्रेमींनी या मुसळधार पावसात घरात राहून गरम-गरम चहा-भजी खाण्याऐवजी घराबाहेर पडणे पसंद केले आणि थेट वेरूळ आणि म्हैसमाळ गाठले.
त्यातच दौलताबादच्या घाटातील गरम गरम मक्याच्या कणसांचा अनुभव घेतला. जगप्रसिध्द वेरूळ लेणी तर यंद्याच्या या मानसूनमध्ये चांगलीच नटली आहे. वेरूळमधील प्रत्येक लेणीच्या आवारात लहान मोठ्या अशा शेकडो धबधब्यांचे आगमन झाले आहे आणि हे धबधबे पाहाण्यासाठी पर्यटकांचीही चांगलीच गर्दी जमली आहे. रविवार असल्याने सर्वच सरकारी आणि खाजगी कार्यालयांना सुटी असल्याने अनेकजण आपल्या बालगोपाळांना घेऊन, तर तरूण त्यांच्या प्रेयसीला घेऊन या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी, चिंब भिजण्यासाठी वेरूळमध्ये आले होते. तर वेरूळच्या त्या धुक्यांचे पांघरूण घेतलेल्या लेण्यांनीही त्यांना निराश केले नाही.
मनाला सुखावणारी आणि आठवणीत कायम राहाणारी अत्यंत मनोहारी ही सर्व दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेकांची लगबग सुरू होती. त्यातील काही विलोभनिय फोटो खास तुमच्यासाठी काढले आहेत आमचे प्रतिनिधी राहुल रणसुभे यांनी... चला तर मग घर बसल्या आपल्या स्मार्टफोन अथवा कॉम्प्यूटरवर या अविस्मरणीय अशा वेरूळ लेणीचा अनुभव घेण्यासाठी एक एक स्लाईड पुढे जात रहा...

पुढील स्लाईडवर पाहा, मुसळधार पावसात नटलेल्या वेरूळ लेणीचे विलोभनिय फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर व्हिडीओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...