आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tourist Place Information On Touch Screen Machine In Aurangabad

पर्यटकांना मिळणार टचस्क्रीनद्वारे माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांच्या सोयीसाठी प्रथमच अत्याधुनिक टचस्क्रीन मशीन औरंगाबादमध्ये येणार्‍या पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रतील पर्यटनस्थळे, कला व हस्तकला, खाद्य परंपरा, वस्तू संग्रहालये, सण, सांस्कृतिक विविधता, छायाचित्रे, नकाशे याविषयी माहिती मिळणार आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या हस्ते शनिवारी (7 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता रेल्वेस्टेशन रोडवरील प्रादेशिक पर्यटन कार्यालयात टचस्क्रीन मशीनचे उद्घाटन होईल. प्रादेशिक कार्यालयासह कलाग्राम, वेरूळ रेस्टॉरंट, अजिंठा टी पॉइंट, तुळजापूर, लोणार, फर्दापूर, सिल्लोड या ठिकाणी ही टचस्क्रीन मशीन बसवण्यात येणार असल्याचे एमटीडीसीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले.